JNV Admission 2027: नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली; आता 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
JNV Admission 2027: नवोदय विद्यालय समितीने (NVS) जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या (JNVST) माध्यमातून शैक्षणिक सत्र २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली होती, ज्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. ती वाढवून आधी १५ ऑक्टोबर करण्यात आली होती, तर आता ही दुसरी संधी आहे जेव्हा जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशाची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या लॅटरल एंट्री प्रवेश २०२७ साठी २२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करू शकतात.
इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय समितीकडून परीक्षा एप्रिल २०२७ मध्ये घेतली जाईल. यामध्ये रिक्त जागांवर निवड आणि परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिला जाईल. इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.
NVS इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी उमेदवारांचा जन्म १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ दरम्यान झालेला असावा. NVS आपल्या नियमांनुसार इयत्ता ९ वी आणि ११ वीसाठी वयोमर्यादेत सूट देखील देईल. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे जन्म दाखला, इयत्ता ८ वी आणि १० वी पास केल्याची मार्कशीट, निवास प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, ग्रामीण कोट्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जारी केलेले प्रमाणपत्र, वर्ग/प्रवर्ग प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
जवाहर नवोदयमध्ये प्रवेशासाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात, जे २०२६-२७ या शैक्षणिक सत्रादरम्यान कोणत्याही सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता १० वीचे शिक्षण घेत आहेत. तसेच २०२६-२७ च्या आधी इयत्ता १० वीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या प्रक्रियेसाठी पात्र असणार नाहीत. तसेच ९ वीच्या प्रवेशासाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्याच जिल्ह्याचे निवासी असणे बंधनकारक आहे, जिथे नवोदय विद्यालय स्थित आहे आणि त्यांनी त्याच जिल्ह्यातील कोणत्याही सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेतून ८ वी किंवा १० वी इयत्ता पास केलेली असावी.
CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; असा तपासा निकाल
1. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी नवोदय विद्यालय समितीच्या navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2. त्यानंतर येथे ‘९ वी आणि ११ वी रजिस्ट्रेशन २०२७’ या लिंकवर क्लिक करा.
3. आता उमेदवारांना ‘रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावे लागेल.
4. नोंदणी केल्यानंतर अर्ज भरा आणि फी जमा करा.
5. तसेच अर्ज पत्रामध्ये मागितलेले आवश्यक कागदपत्रे जसे की फोटो, सही इत्यादी अपलोड करा.
6. आता फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिट करून टाका.
Ans: नाही, इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.
Ans: जवाहर नवोदय समितीकडून इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी परीक्षा एप्रिल २०२७ मध्ये घेतली जाईल.






