फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Rich Dad Poor Dad author : जगाला गरिबी आणि श्रीमंतीचे ज्ञान देणारे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. जगभरात प्रसिद्ध आणि बेस्ट सेलिंग ठरलेली ‘रिच डैड, पुअर डैड’ पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटशी संबंधित भारी कर्ज घेतले आहे. कियोसाकी यांचे रिअल इस्टेटचे साम्राज्य १.२ अब्ज डॉलर्सच्या मोठ्या कर्जावर उभे आहे.
७९ वर्षीय सेल्फ हेल्प गुरू, ज्यांनी १९९७ मध्ये एक पुस्तक लिहिले होते, ज्याच्या ४४ दशलक्षांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत, त्यांनी आर्थिक रहस्ये सांगून बरीच संपत्ती कमावली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे रिअल इस्टेट साम्राज्य जवळपास १.२ अब्ज डॉलर्सच्या कर्जावर उभे आहे. संपत्ती खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे हाच श्रीमंतांचा एक मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या मते, कियोसाकी यांनी उन्हाळ्यात ‘गेट रिच एज्युकेशन पॉडकास्ट’वर म्हटले आहे की, माझ्यावर १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. कियोसाकींची पद्धत अशी आहे की, ते संपत्तीची किंमत वाढल्यावर त्या बदल्यात कर्ज घेतात. त्यानंतर कर्जातून मिळालेली रक्कम करमुक्त उत्पन्न मानतात, ती संपत्ती विकत नाहीत. ते वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या एलएलसीमध्ये (LLC) ठेवतात, जेणेकरून एका डील खराब होण्याचा परिणाम दुसऱ्या डीलवर होणार नाही.
तथापि, त्यांनी चेतावणी देत म्हटले की, जोखीम समजून घेतल्याशिवाय त्यांच्या पद्धतीची नक्कल करू नका. तुम्ही मी करतो तसे करू नका, परंतु मी १९७४ मध्ये याचा अभ्यास केला आहे.
त्यांनी सांगितले की, कर्जाचा वापर कसा करावा हे शिकायचे असेल तर थोडे शिक्षण घेणे उत्तम राहील. त्यांची माजी पत्नी आणि बिझनेस पार्टनर किम कियोसाकी यांनी या आकडेवारीबद्दल सार्वजनिकपणे सांगण्यावर आक्षेप घेतला आहे. वास्तविक, कियोसाकी यांनी म्हटले आहे की हे कर्ज भागीदारांसोबत मिळून खरेदी केलेल्या १५०० अपार्टमेंट युनिट्सशी संबंधित आहे. याचा कियोसाकी यांच्या वैयक्तिक दायित्वावर कोणताही परिणाम होत नाही.
DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
दुसरीकडे, माजी पत्नीचा दावा आहे की त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाणीवपूर्वक या आकडेवारीचा वापर केला आहे, जेणेकरून कर्ज घेऊन गुंतवणूक करणे ही एक उत्तम आर्थिक रणनीती का असू शकते, हे सांगता येईल. आता जर कियोसाकींची आकडेवारी खरी असेल, तर कर्जात त्यांचा खरा वाटा ३० दशलक्ष डॉलर्स ते ६० दशलक्ष डॉलर्स दरम्यान असू शकतो.






