वाळूमाफियांची दादागिरी! शासकीय कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला...

सिंदफणा नदीपात्रातील कारवाईचा राग! बीडच्या गेवराईत कार्यालयात घुसून वाळूमाफियाने तलाठ्यावर केला लोखंडी रॉडने हल्ला; महसूल संघटना आक्रमक.
Mafia Attack
सौजन्य फोटो - AI Gemini Mafia Attack
Published on: 
Updated on: 
  • गेवराईत कार्यालयात घुसून वाळूमाफियाने तलाठी यांच्यावर रॉडने केला हल्ला

  • जप्त साहित्य परत देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा आरोप

  • जखमी तलाठ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथे शासकीय कार्यालयात घुसून वाळूमाफियाने तलाठ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास तपसे असे जखमी तलाठ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Mafia Attack
माझ्या बाळाला परत आणा, मला कोणाकडून काहीच नको!" बोपदेव घाटातील अपघातात सिद्धेशचा मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा...

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली परिसरातील सिंदफणा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करताना तलाठी विलास तपसे यांनी संबंधित व्यक्तीचे साहित्य जप्त केले होते. हे जप्त केलेले साहित्य परत मागण्यासाठी आरोपी थेट कार्यालयात आला होता. मात्र, तलाठी तपसे यांनी जप्त केलेले साहित्य परत देण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीने हातातील लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल; महसूल संघटना आक्रमक

दिवसाढवळ्या कार्यालयात घुसून सरकारी अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, वाळूमाफियांच्या वाढत्या दादागिरीविरोधात आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Q

बीड जिल्ह्यात तलाठ्यावर हल्ल्याची घटना कोठे घडली?

A

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथील शासकीय कार्यालयात तलाठ्यावर हल्ला झाला.

Q

या हल्ल्यात कोणता अधिकारी जखमी झाला आहे?

A

तलाठी विलास तपसे हे या हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Q

वाळूमाफियाने तलाठ्यावर हल्ला का केला?

A

सिंदफणा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात जप्त केलेले साहित्य परत देण्यास नकार दिल्याने आरोपीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे.