सौजन्य फोटो - सोशल मिडीया
रस्त्यावरून चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या झटापटीदरम्यान एका तरुणाचा ट्रेलरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. भाईंदर परीसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. साईनाथ चौहान असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहीती आहे. ते टेंबा हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्युलन्स चालक म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्तावरून चूकीच्या बाजूने येण्याच्या मुद्यावरून काही व्यक्तींमध्ये सुरूवातीला शाब्दिक वात झाला. काही वेळातच हा वाद वाढत गेला
आणि संबंधित व्य़क्तींमध्ये धक्काबुक्की तसेच मारामारी सुरू झाली. प्राथमिक माहीतीनुसार, ओला-उबर चालकांचाही या वादात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
झटपटीदरम्यान ट्रेलरखाली आला
मारामारी सुरू असतानाच त्याचा रस्त्यावरून एक ट्रेलर जात होता. धक्काबुक्की सुरू असताना साईनाथ चौहीन यांचा तोल गेला किंवा झटापटीदरम्यान ते ट्रेलरच्या दिशेने गेले. त्याचवेळी ते ट्रेलरच्या चाकाखाली आले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेशी संबंधित व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
नेमके काय घडले?
या प्रकरणामागील नेमका वाद काय होता,मारामारीत किती जण सहभागी होते आणि साईनाथ चौहान ट्रेलरखाली नेमके कसे आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींची माहिती तपासात महत्त्वाची ठरणार आहे.
या घटनेप्रकरणी नगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. किरकोळ वाहतूक वादातून झालेल्या या घटनेने रस्त्यावरील वाद किती गंभीर रूप धारण करू शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.






