कमला पसंद आणि राजश्री पान मसाला मालकाच्या सुने दीप्ती चौरासिया (40) हिने आत्महत्या केली. सुसाईड नोट सापडली पण नाव नाही. कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. पोलिस तपास सुरू आहे.
पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेवर पुरुषाला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, ब्लॅकमेल आणि दोन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पुरुषाने तक्रार देताच महिलेवर गुन्हा दाखल झाला.
वसईत मंगळवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला, जेव्हा पाण्याच्या टाकीला जोडलेल्या क्लोरिन सिलेंडरमधून अचानक वायूची गळती झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
वाशीमच्या सवासनी गावात घरगुती वादानंतर पत्नीने विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावात शोककळा पसरली.
मुंबईत धक्कादायक घटना! मामा-मामीने 5 वर्षांच्या चिमुकलीला 90 हजारांना विकलं आणि पुढे तिला 1.80 लाखांना पुन्हा विकण्यात आलं. पोलिसांनी तांत्रिक तपास करून 48 तासांत मुलीची सुटका केली आणि पाच आरोपींना…
बीडच्या शिरूर तालुक्यात अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर विद्यार्थ्याला पाच–सहा विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाला असून कारण अस्पष्ट आहे. गुन्हा दाखल नसल्याने पालकांमध्ये भीती वाढली आहे.
मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवस साजरा करताना मित्रांनीच 21 वर्षीय तरुणावर पेट्रोल टाकून आग लावली. तरुण गंभीर भाजला असून 5 आरोपी अटकेत आहेत. घटना सीसीटीव्हीत कैद. नागपुरात प्रेमविवादातून तरुणाची हत्या.
नागपूरच्या काटोलमध्ये एनडीपीएस सेलने 34 किलो गांजा जप्त करून 6 आरोपींना अटक केली. भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाचा सहभाग उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. गांजा ओडिशातून आणला जात होता
नेरळ, रायगड येथे 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी अविनाश मारकेने सचिन भवरवर मोटारसायकलवरून सलग दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी हुकली, दुसरी कंबरेजवळून गेली आणि भवर थोडक्यात बचावले. पोलिस तपास सुरू.
डोंबिवलीत सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या हत्येचा १२ तासांत उलगडा झाला. प्रियंका विश्वकर्माची तिच्या लिव्ह-इन पार्टनर विनोद विश्वकर्माने किरकोळ वादातून गळा दाबून हत्या केली आणि पुरावा लपवण्यासाठी मृतदेह खाडीत फेकला.
26/11 घटना घडून 18 वर्ष झाली. पण 26/11 ची घटना कधीही विसरु शकणार नाही. मुंबईतील या हल्ल्यात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अजूनही अनेक रहस्ये अद्याप उलगडलेली…
बागपतच्या कोतीपुरा भागात अनैतिक प्रेमसंबंधातून एका पतीची पत्नीसमोरच हत्या करण्यात आली. सैनच्या प्रियकर समीरने रियासतवर वारंवार वार करून त्याचा खून केला. पोलिसांनी पुरावे गोळा करून तपास सुरू केला आहे.
डोंबिवलीतील पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये एका तरुणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तिच्यावर अत्याचार व मारहाण करून हत्या झाल्याचा संशय. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, ओळख पटवण्यासाठी तपास सुरू.मुंबईतील डोंबिवली पर
गुवाहाटीतील महिला न्यूज अँकर रितुमोनी रॉय हिने ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये “हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, मला माफ करा” असे लिहिले. तिचे लग्न अवघ्या 12 दिवसांवर होते. पोलिस…
नागपूरमध्ये उसणे दिलेल्या पैशांच्या वादातून एका गुंडाने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेनं धाडस करून तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीमुळे ठाणे राजकारणात उत्सुकता वाढली आहे. या भेटीवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सस्पेन्स वाढवणारे वक्तव्य केले.
छत्तीसगडच्या जशपूरमध्ये मुख्याध्यापकाच्या सततच्या लैंगिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने अभ्यासिकेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये आरोप नमूद; मुख्याध्यापक अटकेत, तपास सुरू.
छत्रपती संभाजीनगरात बनावट UPSC अधिकारी असल्याचे भासवणारी कल्पना भागवत सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना पकडली. तिचे अफगाण–पाक संबंध, बनावट कागदपत्रे आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांमुळे ATS-IB तपास सुरू.
सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी अल्प वेळात आत्महत्या केल्याने गाव शोकमग्न. गोरखच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुरेशनेही गळफास घेतला. दोन मित्रांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. संशयावरून गुंतवणूक व सुसाईड नोट नसल्याचे वकिलांनी न्यायालयात मांडले.