Pune Accident: खूप वाईट बातमी! बसस्टॉपवर मुलं उभी अन् ट्रक आला आणि थेट...; 3 जणांचा चिरडून मृत्यू

भरधाव आयशर टेम्पो एका वाहनाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियत्रंण सुटून आयशर बसस्टॉपवर प्रतीक्षा करत उभारलेल्या इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांना चिरडले.
आयशर टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले
बोपदेव घाटात भीषण अपघात (फोटो- ट्विटर)
Published on: 
Updated on: 
  • बोपदेव घाटावरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले

  • दोघे जागीच ठार, एकाचा रुग्णालयात मृत्यू; दोघे जखमी

  • बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक

Pune Accident: बोपदेव घाटात झालेल्या विचीत्र अपघातात तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. भरधाव आयशर टेम्पो एका वाहनाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियत्रंण सुटून आयशर बसस्टॉपवर प्रतीक्षा करत उभारलेल्या इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांना चिरडले. यामध्ये (Pune) तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात मोठी खळबळ तर उडवली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिद्धेश राजे याचा रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्वेता तळेकर व सोहम घंगाळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे येवलेवाडी आणि कोंढवा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; तिसराही आरोपी अटकेत

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने टेम्पो भरधाव वेगात येत होता. येवलेवाडीकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बसथांब्याजवळ २० ते २५ विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत होते. बसथांब्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर वाहतूक धीमी झाली होती. त्यावेळी टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने सर्वप्रथम पुढे जाणाऱ्या कारला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित टेम्पो थेट बसथांब्याच्या दिशेने गेला आणि तेथे थांबलेल्या विद्यार्थ्यांना धडकला.

या भीषण धडकेत पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने भारती हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक (वानवडी), इनामदार हॉस्पिटल (कोंढवा) आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर, एकाला ससून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

बोपदेव घाट अत्याचारप्रकरणी मोठी माहिती समोर; 8 एप्रिलला...

दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, परिसरात शांतता असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.

Q

पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या अपघातात किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला?

A

पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या भीषण अपघातात तीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

Q

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांचा अपघात कसा झाला?

A

भरधाव आयशर टेम्पोने एका वाहनाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पोने बसस्टॉपवर प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.