वॅगनआर कारमधून आलेल्या चौघांनी अडवली सोन्याची व्हॅन! एमआयडीसीत १६ किलोहून अधिक सोन्याची लुट

वॅगनआर कारमधून आलेल्या चौघांनी जुईनगर एमआयडीसीत सोन्याची व्हॅन अडवली! कर्मचाऱ्यांना मारहाण करत १६ किलोहून अधिक (सुमारे २० कोटींचे) सोने लुटून पसार; आतूनच कोणी 'टीप' दिली का?
Gold Robbery
सौजन्य फोटो - AI Gemini Gold Robbery
Published on: 
Updated on: 
  • सोन्याची व्हॅन अडवून १६ किलोहून अधिक (२० कोटींचे) सोने लुटले

  • मार्गाची माहिती आधीच मिळाल्याचा अंदाज असून, आतूनच कोणी टीप दिली का याचा शोध सुरू

  • मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी फरार आरोपींचा शोध केला सुरू

नवी मुंबई: नवी मुंबईतील जुईनगर एमआयडीसी परिसरात सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास वॅगनआर कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने हा धाडसी दरोडा टाकला. हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण केली आणि व्हॅनमधील सोनं लुटून पळ काढला. या धाडसी दरोड्यात १६ किलोहून अधिक सोने लुटल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बाजारभावानुसार या लुटलेल्या सोन्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

Gold Robbery
माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस... रिक्षाचालकांनीही नकार दिला अन् रुग्णवाहिकेशी संपर्क तुटला; मंदारच्या वकिलाची हतबलता समोर!

सर्व्हिस रोडवर कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, जुईनगर एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवरून सोन्याची वाहतूक करणारी व्हॅन जात असताना रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. चार जणांच्या टोळीने वॅगनआर कारमधून येत व्हॅन अडवली. आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत व्हॅनमधील सोन्याचा ऐवज लुटला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पोबारा केला. भररस्त्यात घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.

आतूनच कोणी 'टीप' दिली का? पोलिसांचा सखोल तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लुटण्यात आलेल्या सोन्याचे वजन १६ किलोहून अधिक असून, त्याची बाजारभावातील किंमत सुमारे २० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

संबंधित सोनं नेमकं कुणाचं होतं? कुठून आणलं जात होतं? आणि संबंधित व्हॅनमधून सोन्याची तस्करी केली जात होती का? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, ज्या पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आला आहे, त्यावरून दरोडेखोरांना आधीच या व्हॅनमधून सोनं नेलं जात असल्याची टीप मिळाली होती. तसेच या व्हॅनचा मार्ग देखील दरोडेखोरांना आधीपासूनच माहीत असावा, त्यानुसारच त्यांनी प्लॅन करून हा दरोडा टाकल्याचा अंदाज आहे. या दरोडेखोरांना आतूनच कोणी टीप दिली का, याचाही सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Q

नवी मुंबईत सोन्याच्या व्हॅनवर दरोडा कोठे टाकण्यात आला?

A

नवी मुंबईतील जुईनगर एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवर रात्रीच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला.

Q

या दरोड्यात किती किलो सोने आणि किती रुपयांचा ऐवज लुटला गेला आहे?

A

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार १६ किलोहून अधिक सोने लुटले गेले असून, बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे.

Q

दरोडा कोणी आणि कशा प्रकारे टाकला?

A

वॅगनआर कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने सर्व्हिस रोडवर सोन्याची व्हॅन अडवून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि सोने लुटून पळ काढला.