सौजन्य फोटो - सोशल मिडीया
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही सेकंदांच्या धक्क्यांमध्ये ३०० हून अधिक घरे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या भूकंपामुळे अनेक कुटुंबांतील जवळची माणसे दगावली असून काही क्षणांत हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपाच्या भीषणतेमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
JUST IN: At least 16 dead, 32 injured and hundreds of homes collapsed after a magnitude 7.0 earthquake struck Tibet, China, officials say. https://t.co/2nTZ5BL4CU — Scope Report (@ScopeReport_) October 22, 2026
‘चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर’ आणि ‘अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण’ (USGS) संस्थेनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर तिबेटमधील नागचू परिसरातील बाचेन काउंटीच्या मारू टाउनशिपमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. हा भाग तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे ३९० किलोमीटर ईशान्येला आहे. हा संपूर्ण परिसर समुद्रसपाटीपासून ४,८६४ मीटर अतिउंचावर आणि दुर्गम पर्वतीय भागात आहे. अत्यंत थंड हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मदत व बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी व ढिगारे हटवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शुक्रवारी पहाटेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी ११ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आपत्कालीन विभागाने संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला असून बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक दबले गेले असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून नुकसानीची अचूक व्याप्ती तपासण्याचे काम सुरू आहे.
Ans: भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर होती आणि केंद्रबिंदू उत्तर तिबेटमधील नागचू परिसरातील बाचेन काउंटीमध्ये १० किमी खोलीवर होता.
Ans: किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत, तसेच ३०० हून अधिक घरे कोसळली आहेत.
Ans: भूकंपाचा भाग समुद्रसपाटीपासून ४,८६४ मीटर उंचावर व दुर्गम पर्वतात असल्याने आणि वीज-दूरसंचार सेवा खंडित झाल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.






