शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या चिपळूणनगर पालिकेच्या सध्या धोकादायक बनलेल्या इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी एका महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असा उदय सामंत यांनी दिला.
पेन्शनमध्ये वाढ, शासकीय अनुदानातील 30 लाख रुपये निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेची 25 वर्षाची अट रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी रास्ता रोको केला.
मालेगावच्या अजंग शिवारात माजी सैनिकांनी एकत्र येत 500 एकरावर सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या वेंकटेश्वरा फार्मिंग कंपनीला विदेशी सरकारच्या अधिकारी शिष्टमंडळाने भेट अभ्यास दौरा केला.
आमदार रवी राणांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर उत्तरात स्पष्ट केले की काँग्रेसकडे विकासाचा कोणताही विचार नाही.
सिन्नर आणि नाशिक ग्रामीण तालुक्यातील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) येथील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.