फोटो सौजन्य - Social Media
सुपर डुपर या सिनेमाच्या निमित्ताने प्रमोशन हेतून सिनेमाचा अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री नम्रता संभेराव ने पुण्याचा विशेष दौरा आखला आहे. त्यासंबंधित त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, ही पोस्ट पुण्यातील त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष आहे. पोस्टमध्ये कुशल आणि नम्रता म्हणतात की, “पुण्यातून आम्हाला जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे, सिनेमाचा पहिला प्रमोशन दौरा हा पुण्यातून निघत आहे. पुण्यातील विविध सिनेमागृहांना आम्ही भेट देणार आहोत. त्यामुळे, पुणेकरांनो! लवकरात लवकर ‘सुपर डुपर’ सिनेमाची तिकिटं Book करा. कुठे ना कुठे आपली भेट नक्की होईल.” हे सांगताना कुशल म्हणाला आहे की, “पुणेकरांनो! तुम्हाला भेटण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी, आम्ही पुण्यात येत आहोत!”
कुशल आणि नम्रताला भेटण्यासाठी पुणेकर उत्सुक असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसून येत आहेत. आधीच ‘सुपर डुपर’ या मराठी सिनेमाला पुण्यातून खूप जास्त प्रतिसाद येत आहे, दरम्यान सिनेमाचे कलाकार कुशल आणि नम्रताच्या येण्याने हा प्रतिसाद द्विगुणित होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नक्की काय आहे ‘Super Duper’
दिग्दर्शक समीर पाटील दिग्दर्शित सिनेमा ‘सुपर डुपर’ मराठी कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात ललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, नम्रता संभेराव तसेच अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी काम केले आहे. दोन विविध जीवनशैली (Old and Modern ) तसेच विचारसरणी असणाऱ्या कुटुंबियांना जेव्हा एका छताखाली राहावे लागते तेव्हा काय घडतं? याचे मजेशीर उत्तर या सिनेमाच्या माध्यमातून मिळत आहे. ते उत्तर पाहण्यासाठी सिनेप्रेक्षक गर्दी करत आहेत.






