तिस्ता सेटलवाड ATS च्या ताब्यात, गुजरात दंगलीवेळी कट कारस्थान रचल्याचा आरोप

अहमदाबादाने गुन्हे शाखेने तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट व गुजरातचे माजी डीजीपी आर.बी.श्रीकुमार यांच्याविरोधात बोगस दस्तावेज तयार करुन चुकीची प्रोसिडिंग सुरू केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संजीव भट पूर्वीपासूनच तुरुंगात आहेत.
new-project-2022-06-25t185425421_1656163658
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली - गुजरात २००२ दंगलीप्रकरणी गुजरात एटीएसने शनिवारी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) आर.बी. श्रीकुमार यांना ताब्यात घेतले. सेटलवाड यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. सध्या त्या सांताक्रुझ पोलिस ठाण्यात आहेत. तेथून त्यांना अहमदाबादला नेण्यात येईल.

अहमदाबादाने गुन्हे शाखेने तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट व गुजरातचे माजी डीजीपी आर.बी.श्रीकुमार यांच्याविरोधात बोगस दस्तावेज तयार करुन चुकीची प्रोसिडिंग सुरू केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संजीव भट पूर्वीपासूनच तुरुंगात आहेत. तर तिस्ता व श्रीकुमार यांना आता ताब्यात घेण्यात आले आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, तिस्ता यांच्याविरोधात शनिवारीच एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीनचिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली होती. ही याचिका झकिया जाफरींनी केली होती. सुप्रीम कोर्ट आपल्या आदेशात म्हणाले - याचिकाकर्त्या सेटलवाड यांनी झकिया जाफरींच्या भावनांचा खेळ मांडला. यावेळी कोर्टाने तिस्ताच्या भूमिका तपासून पाहण्याचे निर्देश दिले.