Makhana Sheera Recipe : नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी गोड पदार्थ बनवण्याचा विचार आहे? मग ही डिश तुमच्यासाठी आहे परफेक्ट. मखाने आरोग्यासाठी सूपरफूड मानले जातात, ज्यामुळे याचा शिरा देवीच्या प्रसादासाठीच तसेच उपवासासाठी चांगला पर्याय ठरतो.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मखाने आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे ठरतात.
यापासून आपण चवदार शिरा देखील तयार करु शकता.
हा शिरा तुम्ही देवीला अर्पण करु शकता.
११ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून १९ ऑक्टोबरपर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. याकाळात दरदिवशी देवीला नव्या रंगाची साडी, प्रसाद, फुले अर्पण केली जातात. तिसरा दिवस हा देवी चंद्रघटाला समर्पित असतो. देवील दरदिवशी काही ना काही गोड पदार्थ अर्पण केला जातो. अशात मखान्याचा शीरा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. मखाने आरोग्यासाठी भरपूर पाैष्टीक मानले जातात आणि ते उपवासातही खाल्ले जातात. तुम्ही देवीला अर्पण केल्यानंतर हा शीरा उपवासातही खाऊ शकता. मुख्य म्हणजे याला तयार करण्यासाठी फार वेळेची किंवा साहित्याची गरज भासत नाही. तुम्ही काही मिनिटांत झटपट हा पदार्थ तयार करु शकता. चला तर मग लगेच रेसिपीसाठीलागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.