Mithai Recipe : जेवणानंतर तुम्हालाही काही गोड खाण्याची क्रेव्हिंग होत आहेत का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तांदळापासून तयार केली जाणारी ही मिठाई फार झटपट आणि कमी साहित्यात तयार केली जाते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
गोड पदार्थ खायला आवडतात का?
गोड पदार्थ आवडत असल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
रेसिपी फार सोपी आणि सहज बनते.
जेवणानंतर काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे. गोड मिठाई बनवायची म्हणजे त्यात अनेक साहित्य लागणार. पण आजची ही मिठाई काहीशी वेगळी असणार आहे. याला बनवण्यासाठी फार साहित्याची गरज भासत नाही. शिवाय कमी वेळेत ही मिठाई बनून तयार होते. फक्त १ कप तांदळापासून तुम्ही हा स्वादिष्ट आणि रुचकर असा गोड पदार्थ तयार करु शकता. अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते किंवा लेट नाईट गोड पदार्थांची क्रेव्हिंग होत असते. अशावेळी हा पदार्थ बनवणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरले. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.