Biryani Recipe : श्रावणात तुम्हालाही बिर्याणी खायची इच्छा होतेय का? मग अशाप्रकारे बनवा व्हेज मटण बिर्याणी. यात मटणाचा वापर नाही पण चव मटणाची आहे... लगेच रेसिपी नोट करा आणि कुटुंबासोबत लज्जतदार चवीची मजा लुटा.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
बिर्याणीला द्या ट्वीस्ट.
श्रावणासाठी खास बिर्याणी रेसिपी.
चव नेहमीच राहिल लक्षात.
बिर्याणी सर्वात स्वादिष्ट व्यजंनांपैकी एक आहे जिची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस पडते. सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे महिनाभर मांसाहार खाणे बंद आहे. अशात मासांहारी पदार्थांची लोकांना जास्तच आठवण येऊ लागते. त्यातही बिर्याणी प्रेमींनी मात्र मटण बिर्याणी खाण्याची क्रेव्हिगं जरा जास्तच होत असते. यावरच एक तोडगा आम्ही काढलाय आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास डिश ‘व्हेज मटण बिर्याणी’. आता तुम्ही म्हणाल हे काय अजबच! पण चिंता करु नका, पदार्थाच्या नावात मटण असलं तरी पदार्थात मटणाचा वापर केला गेला नाही. तथापि, याच्या चवीत मात्र तुम्हाला काहीशी मटणाची चव लागेल. आजची आपली रेसिपीकाही हटके आहे त्यामुळे घरी एकदा तरी ही रेसिपी ट्राय करायला विसरु नका. चला नोट करुन घेऊयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे करुन मिठाच्या पाण्यात साधारण १० मिनिटे उकळवून घ्या.
आता एका वाडग्यात दही, आले-लसूण पेस्ट, एक कांदा आणि टोमॅटोची पेस्ट, हळद, लाल तिखट, उभ्या
चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धणेपूड, मीठ, व्हेज बिर्याणी मसाला आणि मीठाच्या पाण्यात शिजवलेले फणसाचे तुकडे घाला आणि किमान ३० मिनिटे साहित्य छान मुरु द्या.
दुसरीकडे एका कढईत धुतलेला बासमती तांदूळ, आवश्यकतेनुसार पाणी, खडे मसाले, मीठ आणि चमचाभर तेल घालून भात ८० टक्के शिजवून घ्या.
आता एका मोठ्या भांड्यात तूप किंवा तेल गरम करा. यात तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी घालून परता.
यानंतर यात मॅरिनेट केलेले सर्व मिश्रण टाका आणि मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवून घ्या.
आता शिजवलेले अर्धे मिश्रण बाजूला काढा.
खालच्या थरात अर्धे मिश्रण, त्यावर शिजवलेला अर्धा भात मग पुन्हा बाजूला काढलेले मिश्रण आणि वरच्या थरावर पुन्हा अर्धा भात असे नीट थर बसवा.
वरुन तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घाला. अर्धी वाटी दूधात केसराच्या काड्या मिक्स करुनही तुम्ही वरुन घालू शकता. यामुळे चव आणखी खुलते.
आता गॅसची फ्लेम मंद ठेवा, वर झाकण ठेवा आणि बिर्याणीला १५ मिनिटे छान शिजू द्या.
तयार बिर्याणी परंपरेनुसार रायता किंवा कोशिंबीरसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Web Title: Veg mutton biryani note the recipe in marathi