

- महाराष्ट्र सरकारने वाहनचालकांसाठी 'महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना' जाहीर केली आहे.
- येत्या १ डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
- या योजनेअंतर्गत पात्र प्रलंबित ई-चलनांच्या दंडावर २० टक्के सवलत मिळणार आहे.
मुंबई : वाहनचालकांना थकीत वाहतूक दंडासाठी सरकारने 'महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना' जाहीर केली आहे. येत्या 1 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या या योजनेत पात्र प्रलंबित ई-चलनांच्या दंडात २० टक्के सवलत मिळणार आहे. गृह विभागाने यासंदर्भात शासन आदेश काढला आहे. मात्र, आरटीओकडून जारी चलने योजनेतून वगळण्यात आली आहेत.
वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंडाची पावती होते. मात्र, आता या दंडाच्या रकमेतून सवलत मिळणार आहे. राज्य सरकारने 'महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना' जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या पात्र चलनांचा भरणा अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा वाहतूक पोलीस विभागात रोखीने करता येईल.
परवाना निलंबित; वाहन जप्ती होणार
योजनेची मुदत संपल्यानंतरही दंड न भरणाऱ्यांवर परवाना निलंबित करणे, वाहनासंबंधी व्यवहार रोखणे आणि वाहन जप्त करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वाहनचालकांनी मुदतीत दंड भरून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन आहे.
२१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर
या कालावधीतील दंड ३० डिसेंबरपर्यंत भरल्यास सवलत मिळणार.
१ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६
या काळात जारी होणाऱ्या पात्र चलनांसाठी चलन बजावल्यापासून ४५ दिवसांची मुदत असेल.
३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६
या कालावधीसाठी न्यायालय किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित पात्र चलनांचा समावेश आहे. यासाठी न्यायालयाची संमती आवश्यक असेल.
राज्य सरकारने थकीत वाहतूक दंडाच्या वसुलीसाठी 'महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना' जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र प्रलंबित ई-चलनांच्या दंडावर २० टक्के सवलत मिळणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी होणार असून, गृह विभागाने यासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे.
FAQ
1. महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना कधीपासून लागू होणार आहे?
ही योजना १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
2. थकीत वाहतूक दंडावर किती सवलत मिळणार आहे?
पात्र प्रलंबित ई-चलनांच्या दंडावर २० टक्के सवलत मिळणार आहे.
3. या योजनेचा लाभ कोणत्या वाहनचालकांना मिळणार आहे?
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या पात्र प्रलंबित ई-चलनांचा दंड असलेल्या वाहनचालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.