

राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम; रात्रीच्या तापमानात वाढ
पुढील २-३ दिवसांत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज
पुणे : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. सध्या थंडीची प्रतिक्षाच करावी लागत आहे. तर रात्रीच्या तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून, हा बदल फार मोठा नसेल. 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील कमाल तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून, हा बदल फार मोठा नसेल. नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात किमान तापमानात घट झाली होती. २२ नोव्हेंबरच्या आसपास जळगावमध्ये किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. सातारा, कोल्हापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये किमान तापमान २० अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सांगली, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ६० ते ६९ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७१ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात ८७ टक्के राहील, असा अंदाज आहे.
बुलडाणा, अमरावतीतील तापमानात वाढ
बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, वाशीम जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ४८ टक्के, तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ५१ ते ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २२ ते २४ टक्के राहील.
1. राज्यात सध्या थंडीची स्थिती कशी आहे?
राज्यात अद्याप अपेक्षित थंडी जाणवत नसून रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे.
2. पुढील काही दिवसांत तापमानात काय बदल होणार आहे?
पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. मात्र, हा बदल फार मोठा नसेल.
3. कोणत्या भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे?
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथे २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.