तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. सध्या कमाल 30 आणि किमान 12 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरले आहे. काही ठिकाणी धुकेही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात तापमानात आणखी घट होऊन झोंबणारी…
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागात अलिकडच्या काळात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे या प्रदेशात हिवाळा आला आहे. तिन्ही भागात तापमानातही घट झाली आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.
राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.
हरियाणातील अनेक शहरांची परिस्थिती दिल्ली-एनसीआरपेक्षा वाईट होती. बुधवारी राजस्थानमधील शहरांची परिस्थिती गंभीर राहिली. राज्यातील अनेक प्रमुख शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.
वाढत्या प्रदूषण पातळीला रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक भागात मिस्ट स्प्रिंकलर बसवण्यात आले आहेत.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये देखील ऊन पाऊस आणि थंडीचा खेळ सुरूच आहे.
राजधानी दिल्लीत सकाळच्या वेळेस थंड वारे वाहत आहेत. तर दुपारच्या वेळेस कडक उन्हाळा जाणवत आहे. तर रात्री थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस राजधानी दिल्लीत हवामान याचप्रमाणे राहण्याची शक्यता आहे.
राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
पूर्वी जून-जुलै महिन्यांत जोरदार पाऊस पडायचा, पण आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि अगदी ऑक्टोबरमध्येही पाऊस जास्त सक्रिय दिसून येतो. पावसाची सुरुवात उशिरा होते आणि थांबतानाही उशीर होतो.
दक्षिण भारत वगळता देशभरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानदेखील सरासरीच्या कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिल्लीतही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि अधूनमधून सूर्यप्रकाश येईल. राजधानी दिल्लीत गडगडाटी वादळ आणि पाऊस पडू शकतो.