अक्षय कुमारचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट २६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत स्ट्रीम केला जाणार आहे.
प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रेंट सर्व्हिसमध्ये ‘राम सेतू’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर प्रेक्षक ओटीटीवर हा चित्रपट विनामूल्य पाहायला मिळण्याची वाट बघत होते. त्यामुळे ‘राम सेतू’ चित्रपटाच्या विनामूल्य रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘राम सेतू’च्या मोफत ओटीटी रिलीजबद्दल माहिती दिली आहे. येत्या २३ डिसेंबरपासून ‘राम सेतू’ ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर मोफत ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.






