उपवासाचे दहीवडे, खास उपवासाची स्पेशल रेसिपी

tyie
Published on: 
Updated on: 

साहित्य :

१ वाटी वरीचे तांदुळ

१ वाटी सुरण बटाटा भोपळा काप

२ चमचे हिरवी मीरची वाटण

२ चमचे शेंगदाणे कुट

तुप

मिठ

दही

जिरेपुड

लाल तिखट

साखर

साजुक तुप

तळायला तेल

कृती :

सर्व प्रथम एका पातेल्यात थोडे तुप घालुन त्यावर वरीचे तांदुळ कोरडेच परतुन घ्यावे. नंतर परत तुप जिऱ्याची फोडणी करुन त्यावर सुरण बटाटा भोपळा काप घालुन परतुन घ्यावेत . त्यातच हिरवी मीरची वाटण, वरी तांदुळ घालुन परतुन घ्यावे. त्यानंतर त्यात गरम पाणी, मिठ घालुन तांदुळ शिजवुन घ्यावेत.

ताटलीत काढुन घेऊन पुर्ण गार होऊ द्यावेत, नंतर त्यात शेंगदाणे कुट घालुन वड्याच्य्या पिठासाठी हाताने मळुन घ्यावे.

वरील मिश्रणाचे वडे थापुन तेलात तळुन घ्यावेत. दुसरी कडे गोड दही पातळ करुन त्यात मिठ ,साखर घालुन सारखे करावे.

तयार वडे एका खोलगट ताटलीत घेऊन त्यावर दही घालुन वरुन जिरेपुड, तिखट घालुन खायला वाढावे.