महागड्या सिल्क साड्यांची चमक कायम ठेवायची आहे? रंग फिका पडू नये म्हणून 'या' पद्धतीने घ्या काळजी

लग्न समारंभ, घरातील इतर कार्यक्रमांना सर्वच स्त्रिया नटून थटून छान तयार होतात. सगळ्यांचं बनारसी सिल्क, कांजीवरम सिल्क साड्या नेसायला खूप जास्त आवडतात. साड्यांवर करण्यात आलेले सुंदर जरीकाम, नाजूक भरतकाम, मोती आणि आकर्षक नक्षीकाम पाहिल्यानंतर साडी खरेदी करण्याचा मोह महिलांना आवरत नाही. पणसिल्क साडीची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास साडीची जर खराब होण्याची जास्त शक्यता असते. चुकीच्या पद्धतीने साडी धुतल्यास रंग फिका पडून साडीवरील चमक कमी होऊन जाते. त्यामुळे सिल्क साड्यांचा रंग कायम टिकून राहण्यासाठी या पद्धतीने घ्या काळजी. (फोटो सौजन्य – pinterest)
 साडीचा रंग फिका पडू नये म्हणून 'या' पद्धतीने घ्या काळजी

Updated on: 
महागड्या साड्यांची खरेदी केल्यानंतर साडी स्वच्छ करण्यासाठी ड्राय क्लीनिंगला दिली जाते. पण काही साड्यांची काळजी घरी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. साडी स्वच्छ करण्याआधी साडीची शुद्धता ओळखणे फार आवश्यक आहे.

बनारसी सिल्क साड्यांवर जरीकाम आणि भरतकाम केले जाते. साडीच्या लेबलवर 'ड्राय क्लीन ओन्ली' असे लिहलेले असल्यास साडी घरी स्वच्छ करू नये. साडी घरी धुतल्यामुळे साडीची चमक कमी होऊ शकते.

साडीवर धूळ किंवा हलका मळ असल्यास आणि ती साडी हाताने धुवण्याची परवानगी असल्यास थंड पाण्याचा वापर करून साडी स्वच्छ करावी. थोडेसे सौम्य डिटर्जंट किंवा सिल्कच्या कपड्यांसाठी वापरले जाणारे क्लिनर थंड पाण्यात मिक्स करून साडी स्वच्छ करावी.

सिल्क साडी जास्त जोरात घासू नये किंवा साडीवर कोणत्याही प्रकारचा ब्रश मारू नये. साडीतील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी धुतलेली साडी स्वच्छ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवावी.

साडीवर जरीकाम, सिक्विन, मोती किंवा जड भरतकाम केलेले असल्यास अशा साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुवणे टाळावे. मशीन सतत फिरल्यामुळे साडीवरील मोती निघून जाऊ शकतात.