Saree Shopping Tips: अस्सल पारंपरिक हातमागावर विणलेल्या साड्यांची खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

सणवार, लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच स्त्रिया साड्यांची आवर्जून खरेदी करतात. त्यात प्रामुख्याने सिल्क हॅण्डलूम साड्यांची निवड केली जाते. या साड्या अंगावर अतिशय चापून चोपून बसतात, बनारसी सिल्क, कांजीवरम सिल्क, माहेश्वरी इत्यादी साड्या सध्या खूप जास्त ट्रेडींगला आहेत. पण बऱ्याचदा साडी खरेदी करायला गेल्यानंतर हॅण्डलूमच्या नावाखाली पॉवरलूम किंवा अतिशय हलक्या दर्जाची साडी दिली जाते. त्यामुळे हॅण्डलूम साडी खरेदी करताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
अस्सल पारंपरिक हातमागावर विणलेल्या साड्यांची खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Updated on: 
हॅण्डलूम साडी पूर्णपणे हाताने विणली जाते. हॅण्डलूम साडीच्या रंगांमध्ये, धाग्यांमध्ये, साडीवर असणाऱ्या बुट्या एकसमान नसतात. त्यामुळे साडी खरेदी करताना साडीची वीण आणि जाडी पाहणे आवश्यक आहे.

साडीप्रमाणेच तिचा पदर सुद्धा खूप कुशलतेने विणणे सुद्धा आवश्यक आहे. याशिवाय साडीचे काठ  उलट, सुलट बाजुने एकसारखेच दिसतात. त्यामुळे हॅण्डलूम साडी खरेदी करताना पारखून घेणे आवश्यक आहे.

साडी खरेदी करताना दोन्ही काठांची टोके बारकाईने तपासणे आवश्यक आहे. कुठे दोरा ओढलेला दिसत असेल किंवा जास्त दोरा दिसतो. काही ठिकाणी धाग्यांच्या अगदी बारीक गाठी सुद्धा असतात.

पॉवरलूम साड्यांपेक्षा हॅण्डलूम साड्या अंगावर मस्त बसतात. हॅण्डलूम साडीचा स्पर्शही अधिक मऊ असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये पॉवरलूम साड्यांपेक्षा हॅण्डलूम साड्या खरेदी कराव्यात.

हॅण्डलूम सिल्क साडीवर टॅग असतो. त्यामुळे हॅण्डलूम साडीच्या रंगांमध्ये, धाग्यांमध्ये, साडीवर बुटीमध्ये डिझाईन असते. याशिवाय पैठणीवर सोन्याची जर असते.