CJI Surya Kant On INDIA Alliance: सरन्यायाधीशांनी 'इंडिया' आघाडीची भेट नाकारली; का भेटू शकत नाही? पत्राद्वारे दिली उत्तरे
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संदर्भात जेपीसीचा (संयुक्त संसदीय समितीचा) सर्वोच्च न्यायालयातील दौरा रद्द करण्याबाबत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “या प्रकरणात तुलनेने अधिक कारणे आहेत, कारण त्या मुद्द्यावर (एक राष्ट्र, एक निवडणूक जेपीसी बैठकीबाबत) न्यायालयात संभाव्य हितसंबंधांचा संघर्ष निर्माण झाला होता. यामुळे आम्हाला प्रशासकीय बाबींवर चर्चा करणे भाग पडले. माझे वरिष्ठ न्यायिक सहकारी आणि माझे सामूहिक मत होते की आपण कोणताही हितसंबंधांचा संघर्ष टाळला पाहिजे.”
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने एसआयआर आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराच्या मुद्द्यावरुन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ‘मतचोरी’च्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्यास नकार दिला होता. कारण अशी प्रकरणे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. असही त्यांनी सांगितलं होतं.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून सोमवारी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान भेटण्याची विनंती केली होती. ‘मतचोरी’ रोखण्याची, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची, मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी (एसआयआर) थांबवण्याची आणि मतपत्रिका पद्धतीकडे परत जाण्याची मागणी करणारे एक निवेदन त्यांना सादर करायचे होते.






