लोकसभेच्या जागांमध्ये एकसमान ५०% वाढ लागू केली जाणार
२०५१ पर्यंत सध्याचे जागांचे प्रमाण कायम ठेवले जाणार
लोकसभेच्या सदस्यांची कमाल संख्या ८५० जागांपर्यंत वाढवली जाणार
Delimitation Bill Approved In Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली असून सर्व राज्यांमधील जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढणार आहे.
तसेच, या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती केली जाईल. परिसीमन विधेयकात २०२९ च्या निवडणुकांपूर्वी लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या ८५० जागांपर्यंत वाढवण्याचा आणि महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये, बहुमताअभावी हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. आता, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीसमोर घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचे आव्हान आहे.
जर परिसीमन विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळाले, तर महिलांसाठी ३३% आरक्षण लागू केले जाईल. सध्या, घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, २०२१ पर्यंत सध्याचे जागांचे प्रमाण कायम ठेवून, सर्व राज्यांमधील लोकसभेच्या जागांमध्ये एकसमान ५०% वाढ करण्याची तरतूद आहे. एप्रिलमध्ये हे विधेयक मंजूर न झाल्याने, सरकार पुन्हा एकदा ते मंजूर करून घेण्याच्या तयारीत असताना, संसदेचे विशेष अधिवेशन पुन्हा सुरू होण्याच्या काही दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सीमांकन विधेयक मंजूर झाल्यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या मतदारसंघांच्या सीमा नव्याने आखल्या जातील. सीमांकन विधेयक मंजूर झाल्यामुळे लोकसभेच्या जागांची संख्या वाढणार असून ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
वृत्तानुसार, मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी देण्यात आली आणि आरक्षणाशी संबंधित दुरुस्तीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. भाजप सरकारने पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर रोजी आणि राज्यसभेचे २ डिसेंबर रोजी होणार आहे. हे अधिवेशन ३ डिसेंबर रोजी संपणार आहे.