फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, बुधवार, १ एप्रिल रोजी शुक्र, नेपच्यून आणि बुध यांनी एकापाठोपाठ एक शुभ योग तयार केले आहेत. सायंकाळी ०४:४७ वाजता शुक्र आणि नेपच्यून एकमेकांपासून ३० अंशांवर राहून द्विद्वादश योग तयार झाला होता, तर सायंकाळी नेपच्यूनची बुधासोबत युती होऊन अष्टदश योग तयार झाला, जो बुध आणि नेपच्यून एकमेकांपासून १८° कोनीय अंतरावर असताना तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अतिशय विशेष आणि शुभ कोनीय योग आहेत, जे जातकांच्या जीवनात अनपेक्षित शुभ आणि सकारात्मक परिणामांची शक्यता निर्माण करतात. दुहेरी युतीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
वृषभ राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. हे संक्रमण या राशींच्या लोकांसाठी मालमत्ता आणि आर्थिक बाबींमध्ये अनुकूल राहील. घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील, परंतु मानसिक शांती राखणे आवश्यक आहे. प्रवास आणि सामाजिक कार्यक्रम फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तसेच, जुने वाद शांततेने मिटवणेही फायदेशीर ठरेल.
सिंह राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण सकारात्मक राहील. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नवीन यश प्राप्त होईल. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये लाभाच्या संधी निर्माण होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन ओळखी आणि मैत्री लाभदायक ठरतील. वैवाहिक जीवन चांगले राहतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या संधी निर्माण होतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. ज्ञान आणि शिक्षणाशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होईल. नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि कौशल्ये विकसित करण्याच्या संधी फायदेशीर ठरतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. विशेषतः गुंतवणूक आणि लहान-मोठ्या व्यावसायिक व्यवहारांमध्ये यश मिळेल. घरात आणि कुटुंबात शांती व आनंद नांदेल. नवीन ओळखी आणि मैत्री तुमच्या आयुष्यात नवीन आनंद आणतील. तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित करा.
कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. यावेळी तुम्हाला लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. गुंतवणूक आणि आर्थिक बाबींबाबत सुज्ञपणे निर्णय घ्या. तुमचे आरोग्य सामान्य राहील. सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये सक्रिय सहभागामुळे आदर आणि प्रतिफळ दोन्ही मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शुक्र, नेपच्यून आणि बुध यांच्या संयोगाने हा शुभ योग तयार झाला आहे.
Ans: कारण एकाच वेळी दोन सकारात्मक ग्रहयोग तयार होऊन त्यांचा प्रभाव काही राशींवर अधिक लाभदायक ठरतो.
Ans: या शुभ योगाचा फायदा वृषभ, सिंह, वृश्चिक, तूळ आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार






