आयपीएल 2020 मध्ये पंजाबने 223 धावांचे लक्ष्य दिले, तेव्हा राजस्थान संघ गुडघे टेकणार असे वाटत होते. राहुल तेवतियाही संघर्ष करीत होता, त्याने 23 चेंडूत 17 धावा केल्या. चाहत्यांची निराशा झाली, पण राहुल तेवतियाला इतर गोष्टी करायच्या होत्या. त्याने पंजाब किंग्जच्या शेल्डन कॉट्रेलला 5 षटकार ठोकून सामन्याचा रंगच बदलून टाकला. विकेट घेतल्यानंतर सॅल्युट सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉटरेलला आयपीएलमध्ये पुन्हा तसा मान मिळाला नाही.