तिरंदाजी विश्वचषक 2024 : सध्या शांघाय येथे तिरंदाजी विश्वचषक सुरु आहे आणि या विश्वचषकात भारताचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताच्या ज्योती सुरेखा आणि अभिषेक वर्माने कंपाऊंड मिक्स संघामध्ये एस्टोनियाच्या संघाला 158 – 157अशी मात देऊन भारताला सुर्वणपदक मिळवून दिले.
त्याचबरोबर भारताच्या लेकीं सुद्धा मागे राहिल्या नाही. भारतीय महिला कंपाउंड संघाने इटलीचा 236-225 असा पराभव केला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर या भारतीय तिघेने सहाव्या मानांकित इटलीचा मोठ्या फरकाने पराभव करून गोल्ड मेडल भारताच्या नावावर केले. सहा बाणांच्या पहिल्या सेटमध्ये ज्योती, अदिती आणि प्रनीत यांनी केवळ दोनदा 10 गुण गमावले. आणि या तिघांनी मार्सेला टोनिओली, इरेन फ्रँचिनी आणि एलिसा रोहनर या इटालियन त्रिकुटावर सुरुवातीला 178-171 अशी आरामदायी आघाडी घेतली.
GOLD MEDAL SWEEP ? Fabulous performance by the Indian Compound Archers as they sweep the Gold Medals in the Team competition Men Team ✅
Women Team ✅
Mixed Team ✅ #WorldArchery pic.twitter.com/IoGLIaPxB2 — IndiaSportsHub (@IndiaSportsHub) April 27, 2024
त्याचबरोबर भारताच्या पुरुष संघात अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश एफ यांनी नेदरलँड्सचा 238-231 असा पराभव केला आणि भारताच्या संघाला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताच्या तिरंजीची स्टार दीपिका कुमारी हिने सुद्धा विश्वचषकात अंतिम फेरी गाठली आहे.






