Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली
10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स
प्रो अँड टेल (Pro and tell) अशी कंपनीच्या आगामी ईव्हेंटची टॅगलाईन आहे. या ईव्हेंटदरम्यान कंपनी मॅकबुक प्रो, आयमॅक आणि आयपॅड मिनीसह नवीन डिव्हाईस लाँच करणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्वात जास्त चर्चा कंपनीच्या पहिल्या टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रोबाबत होत आहे. मात्र कंपनीने अद्याप या डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये नवीन मॅकबुक प्रो सादर करू शकते. कंपनी 14 इंच आणि 16 इंच स्क्रीनवाले नवीन मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये पहिल्यांदा ओएलईडी डिस्प्ले आणि टचस्क्रीन सपोर्ट ऑफर केला जाऊ शकतो. आतापर्यंत मॅकबुकमध्ये ट्रॅकपॅड आणि कीबोर्डसारखे पर्याय पाहायला मिळाले आहेत. या परिस्थितीत, टचस्क्रीनचा समावेश केल्यास मॅकबुकच्या डिझाइनमध्ये आणि त्याच्या वापरण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडून येऊ शकतो.
इतकंच नाही तर या नव्या मॉडेलमध्ये आयफोनप्रमाणे डायनॅमिक आयसलँड इंटरफेस मिळू शकतो. ओएलईडी पॅनलमुळे अधिक चांगला कॉन्ट्रास्ट आणि डीप ब्लॅक कलर मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या प्रीमियम मॉडलमध्ये M5 Pro आणि M5 Max चिपसेट पाहायला मिळू शकतो. तर एंट्री-लेवल 14 इंच मॅकबुक प्रोमध्ये M6 चिप मिळू शकतो.
कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये नवीन 24 इंच आयमॅक देखील नव्या प्रोसेसरसह लाँच करण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, या डिव्हाईसमध्ये M6 चिप मिळू शकते. या डिव्हाईसच्या डिझाईनमध्ये कोणते मोठे बदल होण्याची शक्यता नाही. कंपनीचा फोकस प्रोसेसर आणि परफॉर्मंसवर अधिक असणार आहे.
कंपनी त्यांच्या नव्या ईव्हेंटमध्ये ओएलईडी डिस्प्लेवाला नवा आयपॅड मिनी देखील लाँच करण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, डिव्हाईसमध्ये ओएलईडी डिस्प्लेसह अपडेटेड A-सीरीज प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यासोबतच, फ्रंट कॅमेरा लँडस्केप स्थितीत हलवला जाऊ शकतो आणि स्पीकर सिस्टममध्येही बदल केले जाऊ शकतात. यामुळे व्हिडिओ कॉल दरम्यान टॅब्लेट वापरणे अधिक सोपे होऊ शकते.
Ans: Apple चा आगामी मीडिया इव्हेंट 28 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Ans: Apple च्या आगामी इव्हेंटची टॅगलाईन ‘Pro and tell’ अशी आहे.
Ans: या इव्हेंटमध्ये नवीन MacBook Pro, 24 इंच iMac आणि OLED डिस्प्ले असलेला iPad Mini लॉन्च होण्याची शक्यता आहे.






