एलन मस्कचं X युजर्सना दिवाळी गिफ्ट! सबस्क्रिप्शन प्लॅन 40% स्वस्त, आता दरमहा मोजावे लागणार इतके पैसे
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X चा मालक एलन मस्क सर्व X युजर्ससाठी दिवाळीचं स्पेशल गिफ्ट घेऊन आला आहे. दिवळीच्या काळात मस्कने सर्व X युजर्सना एक प्रीमियम प्लॅन संबंधित एक मोठं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे आता X युजर्सना सबस्क्रिप्शन प्लॅनवर 40 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. म्हणजेच आतापर्यंत 566 रुपये प्रति महिना उपलब्ध असणारा X चा सबस्क्रिप्शन प्लॅन आता केवळ 340 रुपये प्रति महिना या किंमतीत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रमियम प्लॅनची खरेदी करण्यासाठी X युजर्ससाठी ही एक अत्यंत चांगली संधी आहे.
हेदेखील वाचा- YouTube Shopping Affiliate Program भारतात लाँच, कार्यक्रमाला जागतिक बाजारपेठेत जबरदस्त यश
X युजर्सना आता केवळ 340 रुपये प्रति महिना या किंमतीत ब्लू टिक आणि एक्सची प्रीमियम मेंबरशिप विकत घेण्याची संधी मिळणार आहे. प्रति महिना सबस्क्रिप्शन प्लॅनप्रमाणेच तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या सबस्क्रिप्शन प्लॅनवर देखील डिस्काऊंट दिलं जाणार आहे. X चा संपूर्ण वर्षाचा सबस्क्रिप्शन प्लॅन 6800 रुपयांमध्ये उपलब्ध होता. मात्र आता ही किंमत केवळ 4080 रुपये झाली आहे. म्हणजेच X युजर्सना संपूर्ण वर्षासाठी केवळ 4080 रुपयांत प्रीमियम मेंबरशिप मिळणार आहे. एलन मस्कने यंदाच्या दिवाळीत X च्या प्रीमियम आणि प्रीमियम प्लस प्लॅनच्या किंमतीत बदल केला आहे. प्रीमियम प्लॅनवर युजर्सना 40 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. तर प्रमियम प्लस प्लॅन देखील युजर्सना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
युजर्सना प्रीमियम प्लस प्लॅनवरही 40 टक्क्यांची प्रचंड सूट मिळत आहे. यानंतर प्रिमियम प्लस प्लॅन मिळवण्यासाठी यूजर्सला दर महिन्याला फक्त 680 रुपये द्यावे लागतील. तर त्याची मूळ किंमत 1,133 रुपये आहे. तसेच, संपूर्ण वर्षाच्या प्रिमियम प्लस सबस्क्रिप्शनची, किंमत 13,600 रुपयांवरून 8,160 रुपये करण्यात आली आहे. या प्लॅन अंतर्गत यूजर्सना अनेक फायदे मिळतात. यामध्ये जाहिराती मुक्त आणि सर्वात मोठे रिप्लाय बूस्ट वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे. याशिवाय यूजर्सना यात अनेक मस्त फीचर्स देखील मिळतात. एलन मस्कने हा प्रीमियम प्लॅन गेल्या वर्षी लाँच केला होता.






