एवढं व्हायरल नव्हतं व्हायचं, मी JioHotstar डोमेनचा कायदेशीर मालक आहे; व्हायरल पोस्टवर डेव्हलपरची प्रतिक्रिया
JioCinema आणि Disney+ Hotstar च्या विलीनीकरणानंतर, अशी चर्चा आहे की कंपनी दोन्ही ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर विलीन करू शकते. म्हणजेच Jio Cinema आणि Disney Plus Hotstar मध्ये प्रवेश फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकतो. JioCinema आणि Disney+ Hotstar चे डोमेन Jiohotstar होऊ शकतं. मात्र Disney आणि जिओमधील डील होण्यापूर्वीच एका ॲप डेव्हलपरने Jiohotstar डोमेन खरेदी केले होते. हे डोमेन खरेदी केल्यानंतर ॲप डेव्हलपरने एक पत्र लिहिलं आहे. त्याने हे पत्र इतर कोठेही पोस्ट केलेले नाही तर फक्त https://jiohotstar.com वर पोस्ट केलं आहे. या पत्रात त्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्याचे हे पत्र प्रचंड व्हायरल झालं आहे.
हेदेखील वाचा- तुमच्या स्मार्टफोनमधील क्लाऊड स्टोरेजचे फायदे माहीत आहे का? वाचून व्हाल आश्चर्यचकित
ॲप डेव्हलपरने पत्रात लिहिलं आहे की, कंपनीने त्याच्या पुढील अभ्यासासाठी निधी द्यावा, त्या बदल्यात तो कंपनीला हे डोमेन देईल. ॲप डेव्हलपरला केंब्रिजमध्ये शिक्षण घ्यायचे आहे, त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता आहे. https://jiohotstar.com ही लिंक ओपन करताच तुम्हाला हे पत्र मिळेल. त्या व्यक्तीने पत्रात लिहिले आहे की तो त्याच्या एका स्टार्टअपवर काम करत आहे.
कंपनी विलीनीकरणासाठी भारतीय कंपनीच्या शोधात आहे. Viacom 18 (रिलायन्स अधिकृत) हा एकमेव मोठा खेळाडू आहे जो Disney + Hotstar मिळवू शकतो. जेव्हा जिओने सावन म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी विकत घेतली तेव्हा त्यांनी Saavn.com वरून JioSaavn.com असे डोमेन बदलले. त्यामुळे आता JioCinema आणि Disney+ Hotstar चे डोमेन Jiohotstar होऊ शकतं.
हेदेखील वाचा- आयफोन युजर्ससाठी खुशखबर! लवकरच रिलीज होणार iOS 18.1 अपडेट; या स्मार्टफोन्सला होणार फायदा
डेव्हलपरने लिहिलेलं हे पत्र प्रचंड व्हायरल झालं आहे. आता या व्हायरल पोस्टवर डेव्हलपरची प्रतिक्रिया आली आहे. या ॲप डेव्हलपरने आधी डोमेन विकत घेतले आणि आता डील फायनल होताच त्याने रिलायन्ससमोर मोठी अट ठेवली आहे. त्याने त्याचे मत JioHotstar वरच एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे. पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी रिलायन्सने त्याला पैसे द्यावेत, असे त्यात म्हटले आहे. हे डोमेन मला केवळ माझ्या अभ्यासासाठी निधीच देणार नाही तर आम्हा दोघांच्या या कराराला एक नवीन नाव देखील देईल असे त्यात म्हटले आहे. डेव्हलपरने लिहिलेली ही पोस्ट आणि अट प्रचंड व्हायरल झाली. त्यांनतर यावर प्रतक्रिया देत डेव्हलपर ने एक नवीन पोस्ट केली आहे.
या डेव्हलपरने अलीकडेच सांगितले की ”माझ्या पालकांना या बातम्यांबद्दल काळजी वाटते. हे व्हायरल व्हायला नको होते यार. मी JioHotstar डोमेनचा कायदेशीर मालक आहे. कदाचित कायदेशीर लढाई अजूनही हाताळता येईल. पण पालकांसाठी तडजोड करणे खूप कठीण आहे. काही कायदे जाणकारांनी सांगितले की मी हे डोमेन ठेवावे आणि त्यासाठी लढा द्यावा, डोमेन मिळणे ही एक मालमत्ता आहे.
मी या डोमेनचा कायदेशीर मालक आहे आणि मला पाहिजे तोपर्यंत ते ठेवू शकतो. मी ते कशासाठीही वापरू शकत नाही, परंतु कोणाच्याही ट्रेडमार्कचे उल्लंघन न करता ते शोपीस म्हणून ठेवणे पूर्णपणे कायदेशीर आहे. मला हे डोमेन वापरण्यापासून किंवा ही साइट ऑनलाइन ठेवण्यापासून रोखले जाऊ शकते, परंतु डोमेन सोडण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
JioCinema आणि Disney+ Hotstar या विलिनीकरणाची माहिती फेब्रुवारीमध्ये देण्यात आली होती. काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असेही म्हटले होते की कंपनी आता JioCinema ऐवजी Disney+ Hotstar वर सर्व प्रकारची कंटेंट पब्लिश करेल. त्यांना दोन प्लॅटफॉर्म नको असून एकच प्लॅटफॉर्म चांगला बनवायचा आहे.