

Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor चा नवीन स्मार्टफोन Honor X80i चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन Honor X सीरीजचा एक भाग आहे. तुम्ही बजेट किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Honor X80i एक चांगला पर्याय ठरणार आहे. Honor X80i स्मार्टफोन 4 स्टोरेज आणि रॅम पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 4 रंगात खरेदी करू शकणार आहेत. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.
Honor X80i स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 37,000 रुपये आहे. Honor X80i सध्या चीनमध्ये फ्लोइंग सँड पिंक, लाईम ग्रीन, मून शॅडो व्हाईट आणि ऑब्सिडियन ब्लॅक (चिनी भाषेतून भाषांतरित) या रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Honor X80i स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह अँड्रॉईड 16 वर बेस्ड मॅजिकओएस 10 वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 6.6-इंच 1.5K (1,200×2,600 पिक्सेल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95 टक्के आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये 6,500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 3,840Hz पीडब्लूएम डिमिंग दिल्याचा दावा करण्यात आला आहे. स्मार्टफोनची स्क्रीन एल्युमिनोसिलिकेट ग्लासने सुरक्षित आहे.
Honor X80i मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6500 एलीट चिपसेट दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू, 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Honor X80i मध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये f/2.0 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
Honor X80i मध्ये 5G, वाई-फाई, ब्लूटूथ 6.0, जीपीएस/ए-जीपीएस, बेईडू, जीपीएस, ग्लोनैस, गैलीलियो, क्यूजेडएसएस, ए-जीएनएसएस, एनएफसी, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी सारखे कनेक्टिविटी पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये एक्सेलेरोमीटर, इन्फ़्रारेड सेंसर, कंपास, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देखील दिले आहे. ऑथेंटिकेशनसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.
Honor X80i मध्ये 7,000mAh लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. याला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 रेटिंग दिले आहे.