गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro... डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
भारतात इनफिनिक्स जीटी 50 प्रो 27 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. टिझर ईमेजवरून कंफर्म झाले आहे की, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इनफिनिक्सचं असं म्हणणं आहे की, जीटी 50 प्रो मध्ये Cyber Mecha डिझाईन लँग्वेज देण्यात आली आहे, जी सुपरकार्सच्या स्कल्प्टेड फॉर्म्स आणि एरोडायनॅमिक लाइन्सने प्रेरित आहे. या डिव्हाईसच्या 2D कंपोजिट रियर पॅनलवर केवलर-स्टाइल टेक्स्चर्ड फिनिश मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे डिझाईन फोनला मजबूती तर देतोच पण त्यासोबतच त्याचे वजन हलके राहण्यासाठी देखील मदत करतो. (फोटो सौजन्य: Infinix)
ब्लॅक एबिस आणि रेड ब्लेज अशा दोन रंगांच्या पर्यायांत हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या दोन रंगांना विशिष्ट लिक्विड-कूलिंग ॲक्सेंट्सची जोड देण्यात आली आहे. ब्लॅक एबिसमध्ये ग्रीन एक्सेंट मिळणार आहे, तर रेड ब्लेजमध्ये रेड एक्सेंट देण्यात आला आहे.
या हँडसेटमध्ये इनफिनिक्सची हायड्रोफ्लो लिक्विड कूलिंग सिस्टिम मिळणार आहे, ज्यामध्ये भारताचे पहिले एक्सप्लिसिट व्यूपोर्ट डिझाईन वापरण्यात आले आहे. याच्या रिअर पॅनलवर एक डेडिकेटेड विंडो देण्यात आली आहेस, जिथे लिक्विड-कूलिंग चॅनल्स स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. तसेच, एक खास प्रिंटिंग प्रोसेस लाइट आणि शॅडोसोबत 3D इफेक्ट तयार करते, जे मॅकेनिकल पाइप्ससारखा अनुभव देते.
इनफिनिक्सचं असं म्हणणं आहे की, जीटी 50 प्रो चे थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम कंपनीच्या फ्लो-चॅनल डिझाईनचा वापर करते, ज्यामध्ये उष्णता वेगाने बाहेर टाकण्यासाठी ड्युअल-पंप प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या नवीन दृष्टिकोनाचा उद्देश, कूलिंग हार्डवेयर फोनमध्ये लपवण्याऐवजी थेट समोर दाखवणे असा आहे. हा फोन या वर्षी एप्रिलमध्येच काही निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. याव्यतिरिक्त, इन्फिनिक्सने फोनसोबतच एका संपूर्ण ‘इकोसिस्टम’चीही झलक दाखवली आहे. याचा अर्थ असा की, यासोबतच विशेष गेमिंग ॲक्सेसरीजही सादर केल्या जाऊ शकतात.






