Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर
गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल
कंपनीने त्यांचा नवीन कॅलेंडर मंथ प्लॅन 339 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 1.5GB डेली डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये जिओटिव्ही, जिओटिव्ही एआय क्लाउड सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे ऑफर केले जाणार नाहीत. त्यामुळे हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत फायदे मिळणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या नवीन रिचार्ज प्लॅनमधील सर्वात मोठा फायदा म्हणजेच महिना 30 दिवसांचा असो किंवा 31 दिवसांचा, यूजर्सना संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 एप्रिल रोजी रिचार्ज केले तर पुढील रिचार्ज 5 मे रोजी होईल आणि जर तुम्ही 5 मे रोजी रिचार्ज केले तर पुढील रिचार्ज 5 जून रोजी होईल. काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, एप्रिल महिना 30 दिवसांचा आहे आणि मे महिना 31 दिवसांचा आहे. मात्र दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.
जिओच्या 339 रुपयांच्या या प्लॅनमध्ये गूगल जेमिनी प्रो प्लॅन देखील मोफत मिळणार आहे, ज्याची किंमत 35100 रुपये आहे. यासोबतच 5000 जीबी क्लाउड स्टोरेज, नॅनो बनाना सह इतर फायदे देखील मिळणार आहेत.
रिलायंस जियोच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 5जी डेटा ऑफर केला जाणार नाही, कारण या प्लॅनमध्ये यूजर्सना 1.5 जीबी डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. जिओ आपला 5G डेटा फक्त त्याच प्लॅन्समध्ये देते, ज्यामध्ये दररोज 2GB किंवा त्याहून अधिक डेटा मिळतो.






