गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल
ओप्पो के 15 प्रो प्लस स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आणि स्टँडर्ड व्हेरिअंटची किंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाईसच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 57,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
ओप्पो के 15 प्रो च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये आणि स्टँडर्ड व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ओप्पो के 15 प्रो प्लस साइबर विंग्स, ओरिजिन ग्रे, आणि फोटोडस्ट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे (ही चिनी नावांची भाषांतरे आहेत). दुसरीकडे, ओप्पो के 15 प्रो हा साइबर विंग, गोल्डन लीजेंड, ओरिजिन ग्रे, आणि रेडिएंट डस्ट या चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जातो.
ओप्पो के 15 प्रो प्लस आणि ओप्पो के 15 प्रो हे दोन्ही ड्युअल सिम हँडसेट ओप्पोच्या अँड्रॉईड 16-बेस्ड ColorOS 16 वर चालतात. ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये 6.78-इंच फुल एचडी प्लस (1,272×2,772 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या डिस्प्लेमध्ये 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 450 पीपीआयची पिक्सेल डेंसिटी, 1.07 बिलियन रंग, 330Hz चा टच सँपलिंग रेट आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. तर, ओप्पो के 15 प्रो मध्ये 6.59-इंच फुल एचडी प्लस (1,256×2,760 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 460 पीपीआयची पिक्सल डेंसिटी, 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 240Hz चा टच सँपलिंग रेट देण्यात आला आहे.
नवीन ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट दिला आहे. जो 3.73GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. दुसऱ्या बाजूला ओप्पो के 15 प्रो मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 8500 सुपर चिपसेट दिला आहे, ज्याची क्लॉक स्पीड 3.4GHz आहे. दोन्ही हँडसेटमध्ये 12GB चे LPDDR5x रॅम दिले आहे. ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये 512GB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे, तर ओप्पो के 15 प्रोमध्ये 512GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे.
ओप्पो के 15 प्रो सीरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा आहे. ज्यामध्ये टू-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइज़ेशन (OIS), 10x डिजिटल जूम आणि ऑटोफोकस सारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये मुख्य कॅमेऱ्यासह आणखी एक 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा जोडण्यात आला आहे. हा (f/2.2) अल्ट्रावाइड कॅमेरा आहे, जो 116-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू देतो. समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सल (f/2.4) कॅमेरा आहे. याशिवाय, हे हँडसेट 4K/ 60 fps पर्यंतच्या गुणवत्तेत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.
ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये 8,000mAh बॅटरी आहे, जी 100W सुपरवुक वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओप्पो के 15 प्रो मध्ये 7,500mAh बॅटरी आहे, जी 80W सुपरवुक वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, कलर टेम्परेचर सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर आणि IR ब्लास्टर सारखे सेंसर दिले आहेत. हे फोन 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, बेईडू, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि NavIC ला देखील सपोर्ट करतात.






