Jio Recharge Plan: 700 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... जिओचा 'हा' प्लॅन पाहून यूजर्स चकित, इतकी आहे व्हॅलिडिटी

Recharge Plan: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एक 629 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन, डेटा, कॉलिंग आणि इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत.
Jio Recharge Plan: 700 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... जिओचा 'हा' प्लॅन पाहून यूजर्स चकित, इतकी आहे व्हॅलिडिटी
Jio Recharge Plan: 700 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... जिओचा 'हा' प्लॅन पाहून यूजर्स चकित, इतकी आहे व्हॅलिडिटी
Published on: 
Updated on: 
  • जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 629 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध

  • यूजर्सना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार

  • प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलाअंस जिओ त्यांच्या यूजर्सना विविध प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. या प्रीपेड प्लॅन्समध्ये केवळ डेटाच नाही तर अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर सुविधा देखील ऑफर केल्या जातात. तर काही प्लॅन्समध्ये ओटीटी आणि दुसरे फायदे देखील ऑफर केले जातात. अशाच प्रकारचे काही फायदे कंपनीच्या 629 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील मिळतात. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना विविध फायदे ऑफर केले जाणार आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

629 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 629 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 56 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान यूजर्सना एकूण 112GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. यासोबतच यूजर्सना दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये True 5G देखील ऑफर केले जाणार आहे. तसेच पात्र यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G देखील मिळणार आहे.

जिओहॉटस्टार आणि कॅन्व्हा प्रो लाईट

डेटा, कॉलिंग, एसएमएससोबतच यूजर्सना या प्लॅनमध्ये काही जास्तीचे फायदे ऑफर केले जाणार आहेत. प्लॅनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. यामुळे यूजर्स कधीही आणि कुठेही त्यांचा आवडता कंटेट पाहू शकतात. प्लॅनमध्ये जिओएआयक्लाऊडचे 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे. यासोबतच, 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. ज्याची किंमत 1,590 रुपये आहे.

जिओचा 98 दिवसांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 999 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 98 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. प्लॅनच्या संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान यूजर्सना एकूण 196GB डेटा ऑफर केला जाणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तसेच पात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. तसेच यूजर्सना जिओएआयक्लाऊडचे 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. ज्याची किंमत 1,590 रुपये आहे.