अखेर प्रतिक्षा संपली! WhatsApp यूजर्ससाठी मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट... कसं करणार काम? जाणून घ्या

WhatsApp Schedule Message Feature: व्हॉट्सॲपने यूजर्ससाठी अखेर मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट केले आहे. हे फीचर टप्प्याटप्प्याने रोलआऊट केले जात आहे. त्यामुळे हे फीचर लवकरच वापरता येणार आहे.
अखेर प्रतिक्षा संपली! WhatsApp यूजर्ससाठी मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट... कसं करणार काम? जाणून घ्या
अखेर प्रतिक्षा संपली! WhatsApp यूजर्ससाठी मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट... कसं करणार काम? जाणून घ्या
Published on: 
Updated on: 
  • व्हॉट्सॲप मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट

  • ठरावीक तारीख आणि वेळेसाठी मेसेज शेड्यूल करू शकता

  • एका डेडिकेटेड सेक्शनमध्ये पेंडिंग मेसेजची यादी दिसणार

WhatsApp Feature: व्हॉट्सॲप यूजर्सना गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती. तो क्षण आता अखेर आला आहे. यूजर्ससाठी आता मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट करण्यात आले आहे. यामुळे आता यूजर्स एका ठरावीक तारीख आणि वेळेसाठी मेसेज शेड्यूल करू शकणार आहेत. मेसेजिंग ॲपने सांगितलं आहे की, हे फीचर वैयक्तिक चॅट्स आणि ग्रुप चॅट्स दोन्हीसाठी उपलब्ध असणार आहे. हे फीचर यूजर्सना कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्स किंवा रिमाइंडर्सवर अवलंबून न राहता आधीपासून मेसेज प्लॅन करण्याची आणि शेड्यूल करण्याची सुविधा देणार आहे. मेसेज शेड्यूल करण्यात आलेल्या वेळी सेंडर ऑफलाईन असेल तरी देखील, शेड्यूल मेसेज आपोआप डिलीव्हर केला जाणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

मेसेज शेड्यूल करण्यासाठी फॉलो करा खालील स्टेप्स

कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक टिझर शेअर करत शेड्यूल्ड मेसेज फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स ठरवू शकतात की त्यांना मेसेज कधी आणि किती वाजता सेंड करायचा आहे. मेसेज शेड्यूल करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा आणि एखादे ग्रुप चॅट किंवा इंडिव्हिज्युल चॅट ओपन करा.

  • आता मेसेज टाईप करा किंवा मीडिया अटॅच करा.

  • यानंतर सेंड बटनावर लाँग प्रेस करा.

  • आता तुम्हाला मेसेज डिलीव्हरी करण्याची तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल.

  • आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार मेसेज डिलीव्हर करण्यासाठी वेळ आणि तारीख निवडू शकता.

  • रिपोर्टनुसार, यूजर्स 10 मिनिटांपासून दोन आठवड्यांपर्यंत मेसेज शेड्यूल करू शकतात.

शेड्यूल मेसेज डिलीट केला जाऊ शकतो

शेड्यूल्ड मेसेज टेक्स्ट, लिंक्स, फोटो आणि व्हिडीओला सपोर्ट करते आणि हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहे. जारी करण्यात आलेल हे फीचर डॉक्युमेंट्ससाठी काम करत नाही. तुम्ही टाईप केलेल्या मेसेजसाठी एकदा डिलीव्हरी वेळ निवडण्यात आली की, त्यानंतर मेसेज आपोआप सेंड केला जाणार आहे. मेसेज डिलीव्हरीच्या वेळी सेंडर ऑफलाईन असला, त्याचे इंटरनेट कनेक्शन बंद असले तरी देखील मेसेज ठरवलेल्या वेळीच सेंड होणार आहे. यूजर्स शेड्यूल मेसेज डिलीव्हर होण्यापूर्वी रिव्ह्यू देखील करू शकतात. चॅट इन्फॉर्मेशन स्क्रीनवर एका डेडिकेटेड सेक्शनमध्ये पेंडिंग मेसेजची यादी दिसणार आहे. या ठिकाणी यूजर्स शेड्यूल केलेले मेसेज डिलीव्हरी होण्यापूर्वीच डिलीट देखील करू शकतात. याबाबत रिसिव्हरला कोणतेही नोटिफिकेशन पाठवले जात नाही.

ग्रुप चॅटमध्ये कसं काम करणार फीचर?

ग्रुप चॅटमध्ये जर एखाद्या सदस्याने मेसेज शेड्यूल केला तर हा मेसेज केवळ अशाच लोकांना डिलीव्हर केला जाणार आहे, जे मेसेज शेड्यूल करताना ग्रुपचा भाग होते. मेसेज शेड्यूल केल्यानंतर ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या यूजर्सना हा मेसेज डिलीव्हर केला जाणार नाही.