11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच... 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत
नव्या डिव्हाईसच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, Moto Pad 2026 डिव्हाईस $249.99 म्हणजेच सुमारे 24 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच हे डिव्हाईस ग्राहकांना बजेट किंमतीत चांगला पर्याय ठरणार आहे. तुम्ही हा टॅबलेट अमेरिकेत 30 एप्रिलपासून टी-मोबाईल आणि मेट्रो बाय टी-मोबाईलच्या माध्यमातून खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य – Motorola)
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या टॅब्लेटमध्ये 11-इंच डिस्प्ले दिला आहे. हा टॅब्लेट 2.5K रेजोल्यूशन आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करणार आहे. टॅब्लेट डॉल्बी ऑडियोसाठी ट्यून करण्यात आला आहे. यामध्ये क्वाड-स्पीकर सेटअप दिला आहे. ज्यामुळे हे डिव्हाईस कंटेट पाहण्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. टॅब्लेटमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर दिला आहे. हा एक 5G चिपसेट आहे. हा चिपसेट सहसा मिड-रेंज डिव्हाईसमध्ये पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे की, हे डिव्हाईस जास्त अवघड काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले नाही. जर तुम्ही वाचन, स्ट्रीमिंग आणि हलक्याफुलक्या मल्टीटास्किंगसाठी टॅब्लेट शोधत असाल तर Moto Pad 2026 हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
टॅब्लेटमध्ये स्मार्ट कनेक्ट फीचर दिले आहे. जे तुम्हाला टॅब्लेट, मोटोरोला फोन आणि इतर सुसंगत उपकरणे सहजपणे जोडण्याची सुविधा देते. यामुळे तुम्ही स्क्रीन्स दरम्यान कंटेंट हलवू शकता किंवा वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर कामे सहजपणे पूर्ण करू शकता. या टॅबलेटमध्ये 7040mAh क्षमतेची बॅटरी असून, त्याला 20W चार्जिंगची सुविधा आहे.






