राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री... तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत
Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
वनप्लस 16 स्मार्टफोनच्या 12जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,799 म्हणजेच सुमारे 97,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आहे. 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,21,000 रुपये आहे. या फोनची विक्री चीनमध्ये 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन टुमॉरोज स्टार, मार्शियन मास्टरपीस आणि डार्क फॉरेस्ट या रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: OnePlus)
स्मार्टफोनमध्ये 185Hz रिफ्रेश रेटवाला 6.78-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेनसिटी 450 पीपीआय, लोकल पीक ब्राइटनेस 2,000 निट्स, 100 टक्के जीसिआय-P3 कलर गॅमट, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि 3,840Hz पर्यंत पीडब्ल्यूएम डीसी डिमिंग फ्रीक्वेंसीला सपोर्ट करतो. हा फोन IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. वनप्लस 16 स्मार्टफोन डुअल – सिमसह उपलब्ध आहे, जो अँड्रॉईड 17 वर आधारित ओप्पोच्या लेटेस्ट कलरओएस 17 वर चालतो.
वनप्लस 16 मध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेट देण्यात आला आहे. याच्या प्रोसेसरची पीक क्लॉक स्पीड 5.01GHz पर्यंत आहे. यासोबतच या फोनमध्ये ॲड्रेनो 850 जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, आणि 1TB चे यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. नव्या वनप्लस स्मार्टफोनमध्ये फोन ट्राई-गेमिंग चिप सेटअप – P4 सुपर डिस्प्ले चिप, लिंगक्सी टच चिप, आणि G3 ई-स्पोर्ट्स नेटवर्क देण्यात आले आहे.
नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो ओप्पो लुमो इमेजिंगला सपोर्ट करतो. यामध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.6) प्रायमरी शूटर दिला आहे, जो ड्युअल एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 116-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड रियर कॅमेरा आणि 120x डिजिटल झूमवाला 50-मेगापिक्सेल (f/2.6) टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. हा 3X ऑप्टिकल झूमला देखील सपोर्ट करतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4K/60 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
वनप्लस 16 मध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह 9,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बायडू, क्यूझेडएसएस, आणि गॅलिलिओ देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.






