दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
रिअलमी 16 आणि रिअलमी 16 टी या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत कंपनीने वाढ केली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या तिन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीने केलेल्या या दरवाढीनंतर आता रिअलमी 16 ची सुरुवातीची किंमत 41,999 रुपये झाली आहे. यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 36,999 रुपये होती. कंपनीने स्मार्टफोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. रिअलमी 16 टी आता 31,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 30,999 रुपये होती. कंपनीने फोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे.
रिअलमी 16 स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट आता 41,999 रुपयांत उपलब्ध आहे. यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये होती. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये झाली आहे. या व्हेरिअंटची किंमत पूर्वी 39,999 रुपये होती. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 47,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी या डिव्हाईसची किंमत 42,999 रुपये होती.
रिअलमी 16 टी 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 31,999 रुपये झाली आहे. या डिव्हाईसची किंमत पूर्वी 30,999 रुपये होती. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत पूर्वी 32,999 रुपये होती. आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी 33,999 रुपये मोजावे लागणार आहेत. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 36,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी या डिव्हाईसची किंमत 35,999 रुपये होती.
Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
रिअलमी 16 सिरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. रिअलमी 16 मध्ये कंपनीने 7000mAh बॅटरी दिली आहे. रिअलमी 16 टी मध्ये 8,000mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. हे दोन्ही फोनच्या मागील बाजूला 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.






