टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Realme सज्ज! नंबर सीरिजमध्ये पहिल्यांदाच येऊ शकतो Ultra मॉडेल, असे असू शकतात फीचर्स

Upcoming Realme 17: रिअलमी लवकर एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करणार आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगची तयारी देखील आता सुरु झाली आहे. मात्र यावेळी आगामी स्मार्टफोन सिरीजमध्ये एक नवीन मॉडेल जोडले जाण्याची शक्यता आहे.
टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Realme सज्ज! नंबर सीरिजमध्ये पहिल्यांदाच येऊ शकतो Ultra मॉडेल, असे असू शकतात फीचर्स
टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Realme सज्ज! नंबर सीरिजमध्ये पहिल्यांदाच येऊ शकतो Ultra मॉडेल, असे असू शकतात फीचर्स
Published on: 
Updated on: 
  • पहिल्यांदाच नंबर सीरीज अंतर्गत अल्ट्रा मॉडेल लाँच करणार असल्याची चर्चा

  • आगामी स्मार्टफोनमध्ये 1.5K किंवा 2K रेजोल्यूशनवाला 165Hz ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता

  • रिअलमी 17 अल्ट्रा मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची चर्चा

टेक कंपनी Realme लवकरच 17 सीरीज लाँच करणार असल्याची चर्चा आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगपूर्वीच काही लीक्स समोर आले आहेत. त्यामुळे यूजर्सची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कंपनी त्यांच्या या आगामी लाईनअपमध्ये बेस आणि प्रो मॉडेल्स व्यतिरिक्त आणखी एक मॉडेल लाँच करू शकते, ज्याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही. समोर आलेल्या काही लिक्सनुसार, कंपनी त्यांच्या आगामी 17 सिरीजमध्ये अल्ट्रा मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. खरं तर, कंपनीने त्यांच्या नंबर सीरीज अंतर्गत कधीही कोणते अल्ट्रा मॉडेल लाँच केले नाही. मात्र यावेळी कंपनी पहिल्यांदाच नंबर सीरीज अंतर्गत अल्ट्रा मॉडेल लाँच करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Realme सज्ज! नंबर सीरिजमध्ये पहिल्यांदाच येऊ शकतो Ultra मॉडेल, असे असू शकतात फीचर्स
Jio Recharge Plan: रिचार्ज एक, फायदे अनेक! 50GB क्लाऊड स्टोरेज, ओटीटी सबस्क्रिप्शन अन् बरंच काही... इतकी आहे किंमत

रिअलमी 17 अल्ट्रा

टिप्स्टर अभिषेक यादव (@yabhishekhd) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिअलमी 17 अल्ट्राबाबत डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, RMX5341 मॉडेल नंबर असलेल्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 1.5K किंवा 2K रेजोल्यूशनवाला 165Hz ओएलईडी डिस्प्ले दिला जाणार आहे. हे आगामी स्मार्टफोन एक अनस्पेसिफाइड स्नॅपड्रॅगन चिपसेटने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. तसेच हे डिव्हाईस कलरओएस 17 वर आधारित असणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

कॅमेरा सेटअप

कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, रिअलमी 17 अल्ट्रा मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 50-मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेंसर आणि एक अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट असणार आहे. यामध्ये 120x झूमपर्यंत सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी 4K 120fps रेकॉर्डिंगसह ओपन गेट आणि लॉग व्हिडीओ मोड्ससारखे फीचर्स मिळू शकतात.

टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Realme सज्ज! नंबर सीरिजमध्ये पहिल्यांदाच येऊ शकतो Ultra मॉडेल, असे असू शकतात फीचर्स
आता मुलांच्या X अकाऊंटवर पालकांचा कंट्रोल! तब्बल 20 वर्षांनंतर पॅरेंटल कंट्रोल फीचर रिलीज... जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

तसेच, आगामी रिअलमी 17 अल्ट्रा डिव्हाईसमध्ये 100W चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी आणि फुल-मेटल बिल्ड मिळणार आहे. फोनमध्ये एक इंटरनल कूलिंग फॅन आणि एक लाइट रिंग देखील दिली जाणार आहे. लीक्सनुसार, कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांत सादर केला जाण्याची शक्यता आहे. आगामी अल्ट्रा हँडसेट सिल्व्हर आणि रेड कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये आगमी रिअलमी 17 अल्ट्राची किंमत किंवा लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजेच कंपनीने अद्याप आगामी सिरीजमधील रिअलमी 17 अल्ट्रा मॉडेलची पुष्टी केली नाही.