Redmi गुपचुप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या
डिझाईन कमाल आणि फीचर्स दमदार! Realme चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय, किंमत ठरली खास
चीनमध्ये Redmi R70 5G स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 21,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6GB + 128GB, 6GB + 256GB आणि 8GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Redmi R70m 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 24,600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6GB + 256GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्स कोल्ड मिस्ट ब्लू, फेदर मिस्ट पर्पल, फेदर मिस्ट व्हाइट आणि स्टार रॉक ब्लॅक (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक चीनमधील शाओमी वेबसाईटवरून हे स्मार्टफोन्स खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G मध्ये 6.9-इंच HD (720×1600 पिक्सेल) LCD स्क्रीन दिली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि टच सँपलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. यामध्ये 800 निट्सपर्यंत ब्राइटनेस, 1500:1 चा कॉन्ट्रास्ट रेशियो, DC डिमिंग आणि वेट हँड टच 2.0 चा सपोर्ट दिला आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये यूनिसोक T8300 चिपसेटवर आधारित आहे, जो 6nm प्रोसेसवर तयार केला जातो आणि माली जी57 जीपीयूसह येतो. यामध्ये एलपीडीडीआर4x रॅम आणि यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे. हे डिव्हाईस शाओमी हायपरओएस 3 वर चालते. Redmi R70 5G आणि Redmi R70m 5G या दोन्ही मॉडेल्समध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
स्मार्टफोनमध्ये 5G, 4G, 3G आणि 2G नेटवर्क सपोर्ट, वाय-फाय 5, वाय-फाय 4, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, बेईडू आणि यूएसबी टाइप-सी समाविष्ट आहे. प्रत्येक फोनमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक इलेक्ट्रॉनिक कंपास, एक वर्चुअल लाइट सेंसर आणि एक वर्चुअल प्रॉक्सिमिटी सेंसर आहे. Redmi R70 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आणि Redmi R70m 5G मध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगसह 7.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे.






