Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर
तज्ञांच्या सल्ल्यानुसार एप्रिल महिन्यात उन्हाळा प्रचंड तीव्र असतो आणि अशा परिस्थितीत एसी कमी टेंपरेचर (18-20°C) वर चालवणे योग्य नाही. पण असे का, यामागे कोणती कारणं आहेत आणि एप्रिल महिन्यात एसीचे तापमान किती असावे, या सर्वांबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ञांचा सल्ला आहे की एप्रिल महिन्यात एसी 24°C ते 26°C टेंपरेचरदरम्यान सेट करणं फायद्याचे ठरते. जर तुम्ही एप्रिल महिन्यात एसी 24°C ते 26°C टेंपरेचरदरम्यान सेट केला तर संपूर्ण खोलीत थंडावा राहतो आणि विजेचे बिल देखील कमी येते. तसेच शरीरावर जास्त थंड वातावरणाचा परिमाण देखील होत नाही. भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय देखील 24°C एक बेस्ट AC सेटिंग मानते.
असे अनेक लोकं आहेत जे उष्णता वाढते तेव्हा एसीचे तापमान 18 किंवा 20 डिग्रीवर सेट करतात. असे केल्यामुळे खोली थंड राहिल आणि गरम होणार नाही असं अनेकांना वाटतं. पण तज्ज्ञांचं असं मत आहे की, एप्रिल महिन्यात 18 किंवा 20 डिग्रीवर एसी सेट केल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकतं. सर्दी, खोकला आणि डोकेदुखी सारख्या आरोग्याच्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो. एसीचे तापमान कमी असल्यास विजेचे बिल वाढू शकते आणि एसीवर जास्त लोड देखील पडू शकतो.






