भारतात लवकरच लाँच होणार नवा Poco स्मार्टफोन! दमदार बॅटरी आणि शानदार परफॉर्मंसने जिंकणार यूजर्सचं मन, डिटेल्स आले समोर
नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीकम्युनिकेशन कमीशन (NBTC) च्या वेबसाईटवर Poco M8s स्मार्टफोन मॉडेल नंबर Poco 26067PC09G सह लिस्टेड आहे. लिस्टिंगवरून अशी माहिती मिळत आहे की, कंपनीचा आगामी स्मार्टफोन जीएसएम, डब्ल्यूसीडीएमए, एलटीई आण एनआर नेटवर्कला सपोर्टड करणार आहे. यामुळे कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 4G आणि 5G कनेक्टिविटी मिळणार असल्याची पुष्टी होत आहे. लिस्टिंगनुसार, Poco M8s चीनमध्ये तयार करण्यात आला आहे आणि याचे सर्टिफिकेशन नंबर B38253-26 आहे. स्मार्टफोन लवकरच लाँचिंगसाठी सज्ज असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Poco M8s मधील एक व्हेरिअंट कंपनी बजेट किंमतीत लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कंपनीच्या Poco M8 सिरीजअंतर्गत Poco M8 आणि Poco M8 Pro असे दोन मॉडेल्स लाँच करण्यात आले होते. यामधील Poco M8 स्मार्टफोन भारतात जानेवारी महिन्यात 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटने सुसज्ज आहे.
OnePlus घेऊन येतोय ‘Ultra’ मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या
तसेच, Poco M8 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,520mAh बॅटरी दिली आहे. तसेचा यामध्ये पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP65 + IP66 रेटिंग दिली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये Poco M8 Pro स्मनार्टफोन 299 डॉलर्स म्हणजेच सुमारे 26,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. यामध्ये 6.83-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले आणि 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 चिपसेट असून, 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट आणि 32-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे.






