Tech Tips: स्मार्टफोन चार्ज करताना निष्काळजीपणा पडेल महागात! या चुकांमुळे USB Type-C पोर्ट होऊ शकतं खराब
VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts
विशेष म्हणजेच, यूएसबी टाईप-सी पोर्ट केवळ चार्जिंगसाठी नाही तर डेटा ट्रांसफरसारख्या इतर कामांसाठी देखील महत्त्वाचे आहे. जर यूएसबी टाईप-सी पोर्ट खराब झाले तर तुमची अनेक कामं अडकू शकतात. स्मार्टफोनचे यूएसबी टाईप-सी पोर्ट कोणत्या कारणांमुळे खराब होऊ शकते, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)
फोन चार्ज करताना केबल चुकीच्या पद्धतीने किंवा जोर लावून कनेक्ट केल्यास पोर्टमधील कनेक्टर खराब होऊ शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. यूएसबी टाईप-सी पोर्ट कनेक्टर दोन्ही बाजूंनी फोनमध्ये जोडला जाऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये कनेक्टर लावण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता नाही. केबल कनेक्ट झाली नाही तर फोनमधून डिस्क्नेक्ट करा आणि पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करा.
मोबाईल खिशात, बॅगेत किंवा धुळ असलेल्या ठिकाणी ठेवल्यास यूएसबी टाईप-सी पोर्टमध्ये धूळ किंवा छोटे कण जमा होऊ शकतात. यामुळे स्मार्टफोनमध्ये चार्जिंग केबल योग्य पद्धतीने कनेक्ट केली जाऊ शकत नाही आणि मोबाईल वारंवार चार्जिंगमधून डिस्कनेक्ट होऊ शकतो. स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका. गरज भासल्यास तज्ज्ञांकडून चार्जिंग पोर्ट स्वच्छ करून घ्या.
चार्जिंगदरम्यान फोनचा वापर केल्याने केबलवर दबाव पडू शकतो, विशेषत: जर तुम्ही वारंवार फोन हलवत असाल किंवा केबल वाकडी होत असेल तर फोनवर दबाव पडू शकतो. यामुळे केवळ पोर्टच नाही तर केबलचे कनेक्शन देखील खराब होऊ शकते. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की, चार्जिंगदरम्यान केबल सरळ असेल आणि कनेक्टरवर दबाव पडणार नाही.
मोबाईलमध्ये ओलावा किंवा पाणी असल्यास चार्जिंग केबल कनेक्ट करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे पोर्टमध्ये गंज लागणं किंवा इलेक्ट्रिकल डॅमेजचा धोका अधिक वाढू शकतो. जर मोबाईल पोर्ट ओला असेल तर चार्जर कनेक्ट करणं टाळा.
Ans: चार्जिंग केबल जोर लावून जोडणे, पोर्टमध्ये धूळ साचणे, केबलवर दबाव पडणे आणि ओल्या पोर्टमध्ये चार्जर लावणे ही पोर्ट खराब होण्याची प्रमुख कारणे आहेत.
Ans: केबल जोर लावून जोडल्यास USB Type-C पोर्टमधील कनेक्टर खराब होऊ शकतो आणि चार्जिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.
Ans: पोर्टमध्ये धूळ साचल्यास टोकदार वस्तू वापरून स्वच्छता करू नका. गरज असल्यास तज्ज्ञांकडून पोर्ट स्वच्छ करून घ्या.






