iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत... केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती
घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर
हा कोड अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही डिव्हाईससाठी एकसमान आहे. हा कोड डायल करून यूजर्स त्यांच्या डिव्हाईसचा IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबर तपासू शकणार आहेत. जेव्हा आयफोन चोरी होतो, तेव्हा डिव्हाईस ब्लॉक करण्यासाठी किंवा ट्रेस करण्यासाठी IMEI नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. IMEI नंबरच्या मदतीने तुम्हाला समजू शकते की, तुमचा आयफोन कोणत्या ठिकाणी आहे.
या कोडच्या मदतीने यूजर्स त्यांच्या मोबाईल नेटवर्कची टेक्नीकल इन्फॉर्मेशन पाहू शकणार आहेत. आयफोनमध्ये मिळणाऱ्या सिग्नलची स्ट्रेंथ तपासण्यापासून टॉवर्सची सेल माहिती सर्वकाही या कोड्सद्वारे पाहू शकतो. या कोडमधून मोबाईल नंबर आणि नेटवर्क कॅरियरबद्दलची माहिती देखील मिळवू शकता.
तुम्हाला शंका असेल की तुमचे कॉल्स दुसऱ्या एखाद्या नंबरवर फॉरवर्ड केले जात आहेत आणि तुम्हाला तपासायचे असेल की खरंच तुमचे कॉल्स कोणत्या नंबरवर फॉरवर्ड होत आहेत का, तर तुम्ही *#21# या कोडचा वापर करू शकता. या कोडच्या मदतीने कॉल, डेटा आणि मेसेज कोणत्या नंबरवर फॉरवर्ड केले जात आहेत, या सर्वांबाबत तुम्हाला माहिती मिळणार आहे.
WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या
तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाईसमध्ये कॉल वेटिंग फीचर सुरु आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही या सीक्रेट कोडचा वापरू करू शकता.
सीक्रेट कोड्स छोटे असले तरी यांचे फायदे प्रचंड आहेत. केवळ एक कोड डायल करून तुम्हाला नेटवर्कपासून कॉल वेटिंगपर्यंत विविध फीचर्सबाबत माहिती मिळणार आहे. कंपन्या सहसा कोड्समध्ये बदल करत असतात किंवा काही कोड्स डिसेबल देखील करतात. त्यामुळे अशी शक्यता आहे की, तुम्ही डायल करत असलेले कोड्स त्यावेळी काम करणार नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही कोड डायल करण्यापूर्वी त्या कोडबाबत माहिती मिळवा.






