WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या
iOS व्हॉट्सअॅप बिटा 25.23.10.81 अपडेटद्वारे ही माहिती मिळाली आहे. असं सांगितलं जात आहे की, व्हॉट्सअॅप यूजर्सना त्यांचे आवडते चॅट थीम निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. बिझनेस व्हॉट्सअॅपचा वापर करणारे यूजर्स देखील या फीचरचा वापर करू शकणार आहेत. चॅट थीमच्या मदतीने तुम्ही चॅट आणि संभाषणासाठी वेगवेगळे कलर आणि वॉलपेपर निवडू शकणार आहात. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे चॅट्स जास्त पर्सनलाइज करू शकणार आहेत. हा लूक पाहून तुमच्या डोळ्यांना देखील आनंद होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॅट थीमच्या मदतीने यूजर्सना आयओएस आणि अँड्रॉईडवर चॅट्सना पर्सनलाइज लुक देता येणार आहे. नव्या फीचरच्या मदतीने यूजर्स वेगवेगळ्या चॅट्ससाठी वेगवेगळे रंग आणि वॉलपेपर निवडू शकणार आहेत. सोशल मीडियावर एक ईमेज शेअर करण्यात आली आहे. या ईमेजमध्ये असं पाहायला मिळत आहे की, व्हॉट्सअॅप एका फीचरवर काम करत आहे. हे फीचर वेब यूजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. यामध्ये यूजर्सना वेगवेगळ्या थीम्सची आणि वॉलपेपर्सची निवड करण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे आणि लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. या फीचरमुळे वेब यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर
कंपनी व्हॉट्सअॅप वेब यूजर्ससाठी पहिल्यांदाच चॅट थीमचा नवा पर्याय सादर करणार आहे. यासाठी यूजर्सना प्री-सेट प्रीसेट्स मिळतील, ज्यांच्या मदतीने ते मेसेज बबलचा रंग बदलू शकतील आणि वॉलपेपर फीचर निवडलेल्या थीमला अधिक सुंदर लुक देईल. याचा अर्थ असा की, वेब यूजर्स आता त्यांच्या वेगवेगळ्या चॅट्ससाठी वेगवेगळे रंग आणि थीम्स निवडू शकतील आणि त्याद्वारे त्यांचे चॅट्स इतरांपेक्षा वेगळे बनवू शकतील.






