नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री... BIS वर झाला स्पॉट
विवोचा हा स्मार्टफोन यापूर्वी इंडोनेशियन सर्टिफिकेशन साइट SDPPI वर देखील स्पॉट करण्यात आला होता. मॉडेल नंबर V2624 असलेला हा फोन इंडोनेशियन सर्टिफिकेशनमध्ये V80 FE नावाने लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशनमध्ये विवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. तसेच विवोने देखील अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही. मात्र हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कंपनीच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
विवो व्हि 80 च्या 8 जीबी आणि 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 62,999 रुपये आहे. तर 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये Zeiss कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 50MP टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 1.5K रेजोल्यूशन वाला 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 90W चार्जिंगला सपोर्ट करतो.
कंपनीने गेल्या वर्षी विवो व्हि 70 एफई लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K 120Hz अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो चिपसेट, 200MP मुख्य कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र नंतर कंपनीने फोनची किंमत वाढवून 44,999 रुपये केली.
Ans: Vivo V80 FE च्या भारतातील लाँचची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हा स्मार्टफोन BIS वेबसाइटवर दिसल्यामुळे लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
Ans: Vivo V80 FE ची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. फोन बजेट-फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच होणार असल्याचा दावा असला, तरी किंमतीबाबत कंपनीच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.
Ans: हा स्मार्टफोन BIS वेबसाइटवर V2624 या मॉडेल नंबरने दिसला आहे.






