नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!
Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मलेशियात तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB+128GB, 6GB+256GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या नवीन स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही. ग्राहक नवीन विवो व्ही 80 लाईट 5G एमराल्ड ग्रीन, आफ्टरग्लो पिंक आणि डॉन ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Vivo)
नवीन विवो स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 1.5K, रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सेल डेंसिटी 449 पिपीआय आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 2,000 निट्सची आहे. विवोच्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले P3 वाइड कलर गॅमटसह एचडीआर 10+ आणि 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10,000mAh ब्लूवोल्ट बॅटरी देण्यात आली आहे, जी सिलिकन कार्बन टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.
नवीन स्मार्टफोन 10,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. विवोच्या मते, 1400 पूर्ण चार्ज सायकल झाल्यानंतरही बॅटरी तिची 80 टक्क्यांपर्यंत क्षमता टिकवून ठेवते. विवोचा दावा आहे की, विवो व्ही 80 लाईट 5G स्मार्टफोनने एकाच चार्जवर 32 तास 37 मिनिटांचा लाइव्ह स्ट्रीमिंग बॅकअप देऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स 852 प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे, ज्यासोबत 2-मेगापिक्सेलचा बुके सेंसर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो 90-डिग्री फील्ड ऑफ व्यू सपोर्टसह येतो. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये एआय ईरेज आणि चेक-इन वॉटरमार्क दिला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो. यामध्ये ओरिजिन आयलँड, ड्रॅग अँड गो, ऑफिस किट, गूगल जेमिनी आणि एआय कॅप्शन्स यांसारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळणार आहे.
विवोने हा स्मार्टफोन मलेशियात मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 7300e चिपसेटसह लाँच केला आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी, जीपीएस आणि एनएफसी देण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. हा फोन MIL-STD ड्यूरेबिलिटीसह लाँच करण्यात आला आहे.






