नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर (Use of Internet) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेकांच्या घरी वायफाय (WiFi) बसवले आहे. पण हे वायफाय फक्त बसवून चालत नाही तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असते. तुम्हीही वायफायच्या सुरक्षेची (WiFi Security) काळजी घेतली नाही, तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वायफाय (WiFi Use) कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकता.
या टिप्स करा फॉलो…
पासवर्ड सतत अपडेट करणे
तुम्ही तुमच्या वायफायचा पासवर्ड सतत अपडेट करणे गरजेचे आहे. अनेकवेळा वायफाय पासवर्ड न बदलल्याने वेग खूपच कमी झाल्याचे दिसून येते. जर आपण वायफाय पासवर्ड बदलला तर सर्व स्मार्टफोन आपोआप डिस्कनेक्ट होतात. अनेकवेळा आपण कोणाला वायफाय कनेक्ट करून दिला हे विसरतो. पण पासवर्ड अपडेट केल्याने वायफाय आपोआप कनेक्ट होणार नाही. जेव्हा कोणी WiFi रेंजमध्ये येतो तेव्हा त्याचा फोन आपोआप कनेक्ट होतो. पण वायफाय पासवर्ड बदलल्याने असे होणार नाही.
WiFi IP Address
प्रत्येक इंटरनेट कनेक्शनचा एक IP Address असतो. अशाप्रकारे त्याची ओळख पटते. जर एखाद्या व्यक्तीने फोन तुमच्या वायफायला जोडला आणि एखादी घटना घडली, तर त्यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. यामुळेच तुम्ही तुमचे वायफाय नेहमी अपडेट ठेवावे. वायफायच्या मदतीने कोणतीही घटना घडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
वायफाय कनेक्शन
तुम्ही राउटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वायफाय कनेक्शनची यादी देखील तपासत राहिली पाहिजे. तुमच्या वायफाय कनेक्शनला जोडलेल्या सर्व मोबाईल फोन्सचीही माहिती येथे मिळते. येथून तुम्ही कोणताही मोबाईल फोन सहजपणे कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करू शकता. तुमच्या परवानगीने स्मार्टफोन कनेक्ट केलेला नसेल, तर तुम्ही तो तात्काळ डिस्कनेक्ट करू शकता.






