Viral Knife Attack Video : हळदी समारंभात पत्रकारावर चाकूने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

संभाजीनगरमधील भावसिंगपुरा येथे लग्नाच्या हळदी समारंभात पत्रकार किरण अरसुद यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे आणि पैसे न दिल्याने हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात अरसुद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Viral Knife Attack Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Viral Knife Attack Video फोटो सौजन्य सोशल मिडिया Viral Knife Attack Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 

किरण अरसुद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत

हल्लेखोरांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली

अरसुद यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Viral Knife Attack Video : छत्रपती संभाजीनगरमधील भावसिंगपुरा भागात एका लग्नाच्या हळदी समारंभात चाकूने वार केल्याची धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर येतोय. या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण अरसुद यांच्या पुतण्याचा हळदी समारंभ सुरू असताना, तीन अज्ञात तरुणांनी अरसुद यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घडनेचा व्हिडिओ आता सोशल मिडिया व्हायरल होतोय.

किरण अरसुद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत

मिळालेल्या माहिती नुसार या हल्ल्यात किरण अरसुद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. यामुळे त्याच्या डोक्याला 10 टाके मारण्यात आले. तसेच त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहे. ही घटना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवलेला नाही आणि हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हल्लेखोरांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली

किरण अरसुद हे व्यवसायाने पत्रकार असून मंगळवार 24 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या पुतण्याच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडल्याचे सांगितले जाते.प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने तीन तरुणांनी घरात/मंडपात घुसून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अरसुद यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे माहिती आहे.

अरसुद यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

व्हायरल व्हिडिओमध्ये घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही हल्लेखोर चाकू नाचवत इतरांना धमकावून पळून जाताना दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय. या घटनेला 24 उलटूनही आरोपींवर अद्यापर कठोर कारवाई करण्यात आली नाही. अरसुद यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच ही घटना छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असे सांगितले जाते. या हल्ल्यामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

या घटनेमुळे राजकिय वातावरण तापलेले पाहण्यास मिळत आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित करत पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.