Leopard Attack in Assam:बिबट्याचा थरारक हल्ला कॅमेऱ्यात कैद; वनविभागाच्या बचावकार्यात मोठी दुर्घटना

आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील लेझाई देवानबारी कैबर्ता गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नादरम्यान त्याने जाळे फाडून उपस्थितांवर हल्ला केला.
Leopard Attack in Assam फोटो सौजन्य सोशल मिडिया
Leopard Attack in Assam फोटो सौजन्य सोशल मिडिया Leopard Attack in Assam फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • बिबट्याने जाळे फाडले आणि उपस्थित लोकांवर हल्ला

  • उपचारांसाठी लेझाई मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल

  • वनविभागाने जखमी बिबट्याला ताब्यात घेतले

Leopard Attack in Assam : सोशल मिडियावर आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील लेझाई देवानबारी कैबर्ता गावातून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय. या व्हिडिओ मध्ये एका बिबट्याने धुमाकूळ घालत तीन ग्रामस्थांना जखमी केले आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्यात बिबट्याने कुलमणी दास, फुलेश्वर दास आणि रूपेश्वर दास यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्यात हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. यांना उपचारांसाठी तातडीने लेझाई मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

बिबट्याने जाळे फाडले आणि उपस्थित लोकांवर हल्ला

मिळालेल्या माहिती नुसार गावात बिबट्या दिसल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली.वनविभागाचे पथक केवळ एका जाळ्यानिशी (net)तिथे पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, बिबट्याने जाळे फाडले आणि उपस्थित लोकांवर हल्ला केला.

उपचारांसाठी लेझाई मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल

जखमींची माहिती. सुरुवातीच्या वृत्तांनुसार कुलमणी दास, फुलेश्वर दास आणि रूपेश्वर दास हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी लेझाई मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही स्थानिक वृत्तसंस्थांनी या हल्ल्यात एकूण चार जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.

वनविभागाने जखमी बिबट्याला ताब्यात घेतले

बिबट्याच्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या आणि स्वसंरक्षण करणाऱ्या ग्रामस्थांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला. माहितीनुसार वनविभागाने जखमी बिबट्याला ताब्यात घेतले. उपचारांसाठी डिगबोई येथील केंद्रात हलवले होते, तर ताज्या वृत्तांनुसार ग्रामस्थांच्या हल्ल्यात या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्यादरम्यान वनविभागाकडे पुरेशी सुरक्षा साधने नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.